शिंदे सरकार गुजरातमधून चालते, तिथेच दसरा मेळावा घ्या! महाराष्ट्राला अक्कल शिकवू नका- राऊतांची टीका
Shiv sena Sanjay Raut critcise Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रात दसरा मेळावा घेण्याचा नैतिक अधिकार नाही, तो मेळावा त्यांनी गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये घ्यावा त्या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून पंतप्रधानांना आणि अदानीला प्रमुख वक्ता म्हणून बोलवावे,कारण त्यांचे सरकार तेथूनच चालते . त्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला अक्कल शिकवू नये असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
जर महाराष्ट्रातील शाळा ते अदानींला देत असतील तर त्यांनी मेळावा देखील गुजरातमधील अदाणीच्या जागेवर घ्यावा, महाराष्ट्रात दस मेळावा घेण्याचा शिंदेंना कोणताही नैतिक अधिकार नाही तसेच आम्ही आमित शहा आणि नरेंद्र मोदींचे दलाल नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे एजंट आहोत आहोत असा हल्लाबोल देखील राऊत यांनी केला.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस सोडा सणासुदीत पगार तरी मिळेल की नाही, तसेच या योजनेमुळे होमगार्ड आणि सेक्युरीटींना पगार मिळतील की नाही याची खात्री नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले की, या योजनेचं श्रेय घेण्याची महायुतीतील नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे. माझ्याकडे ते पत्र आहे. भाजपनेच ही योजना कशी आणली, आम्हीच कशी आणली हे दाखवण्याचं श्रेय फडणवीस यांनी करत आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
ही चुनावी जुमला योजना
लाडकी बहिण सारखी योजना मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान या ठिकाणी सुरू होत्या. फक्त निवडणुकीसाठी या योजना आणण्यात आल्या. तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहीण योजनेचा कोणताही पैसा मिळणार ही योजना जुमला आहे. अर्थ खातं अस्तित्वात नाही, खडखडाट आहे. तिजोरी रिकामी आहे. तरीही मतांसाठी योजना रेटली जात आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही निवडणुकीसाठी केलेला फंडा आहे असे मी नाही तर नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications