संजय गायकवाड म्हणाले- जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देईल
Sanjay Gaikwad On Rahul Gandhi : शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे कायमच त्यांच्या विधानावरुन चर्चेत असतात. वादग्रस्त विधान म्हणा किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवारीने केक कापणे असो. विरोधात बोलणाऱ्याला भररस्त्यात मारणं, असो अशा कृत्यांमुळे ते कायमच चर्चेत असतात. त्यातच गायकवाड यांनी कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे.
जो कोणी राहुल गांधी यांची जीभ छाटेल, त्याला माझ्याकडून 11 लाखांचं बक्षीस देणार, असं खळबळजनक विधान त्यांनी केले. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ उडाला आहे. त्यांच्या या विधानानंतर कॉंग्रेसकड़ून देखील खालच्या स्तरावर प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, राहुल गांधी यांनी जे अमेरिकेत जाऊन आरक्षणाबाबत विधान केले आहे. यातून त्यांची नियत दिसून येते. आम्हाला आरक्षण संपवायचंय असे विधान करून त्यांनी त्यांचे दात दाखवले. मुळात लोकसभा निवडणुकीत यांनी संविधान बदलणार असा खोटा नरेटिव्ह पसरवून मतं मिळवतील. माझं तर आवाहन आहे की, जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे.
महाराष्ट्र आणि देशात आरक्षणाची आग लागली आहे. त्यातच मागासलेल्या जातींना इतर समाजांच्या बरोबरीनं उभं करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. असं असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आमच्या देशातलं आरक्षण मला संपवायचंय, असं वक्तव्य केलं. काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्यांच्या पोटातील मळमळ त्यांनी ओकून दाखवली. संविधान धोक्यात आहे, संविधानात आपलं आरक्षण संपवणार आहे, असा फेक नरेटिव्ह पसरवला आणि दलित समाजाची मतं घेतली. आणि आज आरक्षण संपवण्याची भाषा करतायत, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
वडेट्टीवारांचा गायकवाडांवर निशाणा
कॉंग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटून आणण्याला 11 लाखांचं जाहिर बक्षीस देण्यात येईल, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अलिकडेच आरक्षणासंदर्भातील राहुल गांधी यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावरून विरोधकांनी आता राहुल गांधी यांच्यावर टिका करण्यास सुरूवात केली आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संजय गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पागल पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची गरज नाही
संजय गायकवाड यांनी दिलेले स्टेटमेंट सातत्याने वादग्रस्त राहिलेले आहे. या पागल पाळलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला कोणतीही आवश्यकता वाटत नाही. तु राहुल गांधींची काय गोष्ट करतोय. तुझीच तुझ्या पक्षात काय अवस्था आहे ते बघ आधी. राहुल गांंधींच्या नावं घेण्याची तुझी औकात नाही अशी जहरी टिका वडेट्टीवारांनी गायकवाड यांच्यावर केली आहे.
सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार
संजय गायकवाड यांनी दिलेले स्टेटमेंट सुर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे, तीच थुंकी तुमच्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटून जाईल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमची मस्ती जनता नक्कीच उतरून टाकेल. प्रंचड भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला विकून शिवसेना शिंदेसेनेने जो पैसा गोळा केला आहे. त्यातून अशी बेताल वक्तव्य केली जात आहेत. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला तुमची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य









Click it and Unblock the Notifications