Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आ. महेंद्र थोरवेंच्या सुरक्षारक्षकाची दादागिरी; भरचौकात कारचालकाला रॉडने मारहाण, VIDEO व्हायरल

MLA Mahendra Thorave Bodyguard Hits Car Driver : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाने एका कार चालकाला भरदिवसा अन् भरचौकात हाती रॉड घेऊन बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून ठाकरे गटाने जोरदार निशाणा साधला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरळ येथे एक व्यक्ती एका कारमधील व्यक्तीला जाडजूड रॉडने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित व्यक्ती वेदनांनी जोरात ओरडताना दिसून येत आहे. पण कुणीही त्याच्या मदतीला जात नाही. विशेष म्हणजे मारहाण करणारा बॅटिंग करण्याच्या स्टाइलमध्ये कारचालकाला चोपत होता. मारहाण करणारा हा आमदार महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला.

Maharashtra Politics

ठाकरे गटाने काय केली टीका, साधला निशाणा

उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणी शिंदे गटावर टीकेची झोड उठवत राज्याच्या कायद्याच्या चिंधड्या उडवल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाने आपल्या X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही... कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!

ठाकरे गटाची टीकेची झोड

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आमदार थोरवेंवर निशाणा साधला. ही सत्तेची मस्ती असल्याची टीका केली त्यांनी केली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी आमदार थोरवेंवर निशाणा साधला आहे. मारहाण करणारा व्यक्ती कोणत्या आमदाराचा अंगरक्षक आहे किंवा नाही मला त्यात रस नाही. पण एखाद्या व्यक्तीला भररस्त्यात अशी मारहाण करण्याची हिंमत होते ही फार गंभीर गोष्ट आहे. यातून राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली एवढ मात्र नक्की, असेहरी त्या म्हणाल्या.

आमदार थोरवेंनी आरोप फेटाळले

दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी मारहाण करणारा व्यक्ती आपला बॉडीगार्ड नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हा प्रकार 2 कार्यकर्त्यांमधील वादाचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ठाकरे गटाने मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. पण ते दोघेही आमचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यातील वादातून हा प्रकार घडला असावा. या प्रकरणी त्यांनी काही चुकीचे कृत्य केले असेल तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणालेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+