मोठी बातमी: आधी गोळीबार आता त्याच नेत्याला जीवे मारण्याची धमकी; म्हणाले, तुझा बाबा सिद्धीकी करु...
महाराष्ट्राला हदरविणारी बातमी आता समोर आली आहे. शिवसेना नेते महेश गायकवाड यांना धमकी देणारे पत्र आले आहे. अंबरनाथ येथील एका लग्नसमारंभात ते गेले असता त्यांना एक बंद पाकीट देण्यात आले. त्यात त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे याच महेश गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. आता पुन्हा महेश गायकवाड यांना धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

नेमका काय आहे प्रकार?
शिवसेना नेते महेश गायकवाड हे अंबरनाथ येथे आनंदनगरमध्ये एका लग्नसमारंभात गेले होते. त्या ठिकाणी एका इसमाने त्यांच्या हातात एक चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत त्यांना जिवेम मारण्याची धमकी देण्यात आली. चिठ्ठीत लिहीले होते की, गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड याचे नाव घेऊ नको. नाही तर तुझा बाबा सिद्दीकी करू... या धमकीनंतर महेश गायकवाड हे तातडीने अंबरनाथ पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी अज्ञात इसमाबाबत तक्रार नोंदवली.
यापूर्वीही झालाय गोळीबार
उल्हासनगर पोलीस ठाण्यात भाजप माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यात झालेला वाद देशभर चर्चेत आला होता. यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणानंतर माजी आमदार गणपत गायकवाड सध्या कारागृहात आहेत. परंतु महेश गायकवाड यांनी धमकी मिळाली आहे.
काय म्हणाले महेश गायकवाड?
महेश गायकवाड यांना लिहिलेल्या चिठ्ठीचा कागद आणि पॉकीट जेलमधील आहे, असा आरोप महेश गायकवाड यांनी केला. ते म्हणाले, ही चिठ्ठी गणपत गायकवाड यांनीच पाठवल्याचा संशय आहे. गणपत गायकवाड १५ दिवस कारागृहात तर १५ दिवस रुग्णालयात असतात. त्याच्यावर अनेक आका लोकांचा हात आहे. त्यामुळे त्याची मजा चालली आहे. तसेच वैभव गायकवाड याला क्लिन चिट दिली आहे. या प्रकरणात आपण सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. त्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications