मुलगा नृत्यसम्राट, वडील नटसम्राट! शितल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी डान्स केला, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी मुलगा तेजस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करुन शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनी वडील नटसम्राट आणि लेक नृत्यसम्राट अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर उपरोधिक टीका करत खिल्ली उडवली आहे.

मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचे लग्न राधिका मर्चंट हिच्याशी होत आहे. या जोडप्याच्या लग्नापूर्वी खास संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. मु्ंबईतील बीकेसी येथील नीता अंबानी यांच्या कल्चरल सेंटरमध्ये झालेल्या या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांसह देशातील विविध क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली होती. त्यात अनेकांनी डान्स करून अंबानी कुटुंबीयांच्या आनंदात भर टाकली.
स्टारकास्टसोबत तेजस ठाकरेंचा डान्स
या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व फोटो व्हायरल झालेत. त्यातील एका व्हिडिओत उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओत त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, शिखर पहाडिया आदी अभिनेते नृत्य करताना दिसून येत आहेत.
काय आहे शितल म्हात्रेंची पोस्ट
सोशल मिडिया पोस्टमध्ये शितल म्हात्रे यांनी एक व्हिडिओ शेअऱ केला. त्यानंतर त्यांनी एक पोस्टही टाकली. ''अरे... अंबानींच्या लग्नातला हा बॅकग्राऊंड डान्सर ओळखीचा दिसतोय... हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव, तेजस ठाकरे ... उत्तम कला आहे एकेकांजवळ ... वडील नटसम्राट ... लेक नृत्यसम्राट...असा मजकूर पोस्टमध्ये आहे.
निलेश राणेंचाही निशाणा
भाजप नेते नीलेश राणे यांनीही तेजस ठाकरेंच्या व्हिडिओवरुन खिल्ली उडवली. त्यांनी तेजस ठाकरे यांचा उल्लेख साला, नाच्या ठाकरे असा करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 'तुम्ही आता तेजस ठाकरेला गुजरातला पळवले असे म्हणा..' असा टोमणाही त्यांनी ठाकरेंना लगावला.
अनंत अंबानींच्या लूकची चर्चा
लेहेंग्यात ऑफ-शोल्डर क्रिस्टल स्टेटमेंट ब्लाउज आणि मल्टी-पॅनल स्कर्ट होता. ज्यावर चमकदार स्वारोवस्की क्रिस्टल्स एम्बेड केलेले होते. अनंत अंबानी यांनी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेली सोनेरी जरी, कसाब आणि सिक्विन एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेटही घातले होते. या ड्रेसची खास गोष्ट म्हणजे हे जरीचे काम खऱ्या सोन्यापासून बनवले होते. त्याच्या बटणावर डायमंड वर्क केले होते.
अनंत अंबानींनी घातला सोन्याचे जॅकेट
अनंत अंबानी यांनी संगीत सोहळ्यासाठी सोन्याचे खरे जॅकेट परिधान केला होता. अनंतने आपला लूक पूर्ण करण्यासाठी पोनीटेल हेअरस्टाइलमध्ये केस बांधले होते. अनंतच्या जॅकेटशिवाय, त्याच्या अनोख्या ब्रोचने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले. ब्रोचमध्ये रॉयल बेंगाल टायगरला हिऱ्याने जडवलेल्या बँडमध्ये मोठ्या माणिक सेटवर बसवलेले होते. तिचे हे ब्रोच प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर लॉरेन श्वार्ट्झ यांनी डिझाइन केले होते.












Click it and Unblock the Notifications