Shiv Rajyabhishek Day 2025 : मित्र अन् प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश अन् राजांना करा अभिवादन

Shiv Rajyabhishek Day 2025 : छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजांपैकी एक होते. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्या राज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रायगडावर दरवर्षी हा सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, इ.स. 1674 रोजी रायगड किल्ल्यावर एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. 'शिवराज्याभिषेक' हा सोहळा हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. या दिवशी शिवाजी महाराज विधीपूर्वक छत्रपती झाले आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

त्यांनी बालपणापासूनच राजकारण, युद्धशास्त्र आणि लोकसेवा यांचा अभ्यास केला होता. म्हणूनच आजही त्यांना जगातील महान योद्ध्यांपैकी एक मानले जाते. Shiv Rajyabhishek Day 2025 shubhechcha in Marathi आजच्या या शुभप्रसंगी तुमच्या मित्रांना शिवराज्याभिषेकाच्या खास शुभेच्छा पाठवा, त्यासाठी तुम्हाला ही बातमी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

shivrajyabhishek sohala 2025

मराठमोळ्या शुभेच्छा... पाठवा तुमच्या प्रियजनांना...!

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

''निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।। नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती। पुरंदर आणि शक्ति, पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत वरदवंत। पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा।।'' शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

''प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!'' शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा.

shivarajyabhishek day 2025

सह्याद्रीच्या रांगांवरती, सदा मुघलांच्या नजरा, बोटं छाटली तयांची, त्या शिवबांना माझा मुजरा.. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

'हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा...' शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा - माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती असा आमचा "राजा शिवछत्रपती" शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

shivarajyabhishek day 2025

''माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा'' शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल प्रशासनकर्ते छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांना 'राज्यभिषेक दिनी' मानाचा मुजरा

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही केवळ एक उत्सव नाही, तर ती आपल्याला त्यांचे विचार स्वीकारण्याची संधी देते. जय भवानी, जय शिवाजी!शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त, आपण सर्वजण अन्यायाविरुद्ध नेहमीच उभे राहू अशी प्रतिज्ञा करूया! जय शिवाजी!शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा

शिवाजी महाराज हे केवळ इतिहास नाहीत, तर ते आपल्या स्वाभिमानाचे आणि शक्तीचे प्रतीक आहेत! जय शिवाजी! शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा...

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+