Shiv jayanti 2026 marathi shayari powada शिवजयंतीला अंगावर शहारे आणणारे पोवाडे-शायरी खास तुमच्यासाठी
Shiv jayanti 2026 marathi shayari powada : "जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी... फक्त एकच नाव, शिवछत्रपती!" रयतेचा राजा, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ढोल-ताशांचा गजरात आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात आसमंत दुमदुमून गेला आहे. या मंगलमयी दिनी आपल्या राजाचा इतिहास शब्दांत गुंफण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अंगावर शहारे आणणाऱ्या काही खास शायरी आणि पोवाड्यांच्या ओळी.

कडक शिव-शायरी (Shiv Jayanti Special Shayari)
१. तलवारीची धार:
"न शिवबांसारखा राजा झाला, न कधी होणार...
मुघलांच्या छाताडावर पाय देऊन, स्वराज्याचा भगवा कायम डोलणार!"
२. सह्याद्रीचा वारसा:
"कपाळी केशर, हाती तलवार,
काळजात वाघाची डरकाळी आणि नजरेत अंगार...
असे होते आमचे 'शिवछत्रपती' जागतिक कीर्तीचे थोर!"
३. मृत्यूलाही भय:
"मरणाची भीती त्यांना वाटते जे चुकून जगतात,
आम्ही शिवबांचे मावळे आहोत, जे मरणाच्या दारातही 'जय शिवराय' म्हणतात!"
४. जिजाऊंचा शिवबा:
"अंधार फार झाला आता प्रकाश हवा आहे,
महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊंचा 'शिवबा' हवा आहे!"
५. वाघाची चाल:
"वाघाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा सन्मान आणि शत्रूचा थरकाप...
हेच तर आहे माझ्या राजाचे खरे रूप!"
६. भगवा रंग:
"काव्याची भूक नाही, शब्दांची गरज नाही,
माझ्या राजाच्या नावासाठी, रक्ताचा प्रत्येक थेंबही कमीच आहे!"
७. श्वासात शिवराय:
"श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यात जिद्द जपतो...
आम्ही शिवरायांचे मावळे, मृत्यूलाही समोर झुकवतो!"
पोवाड्याच्या धडाकेबाज ओळी (Powada Lines)
८. पन्हाळगडाचा वेढा (बाजीप्रभू देशपांडे शौर्य):
"पावनखिंड ती रक्ताने न्हाली, बाजीची तलवार तळपली...
तोफ जोवर वाजत नाही, तोवर देह हा सोडत नाही...
राजा माझा गडावर पोहचला, धन्य तो बाजी पावनखिंडीत अमर झाला... जी जी जी!"
९. सुरतेची स्वारी:
"सुरतेवरती स्वारी केली, मुघलांची दाणादाण उडाली...
रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची आज्ञा दिली...
असा शिस्तप्रिय राजा माझा, साऱ्या जगाने वंदिला... जी जी जी!"
१०. राज्याभिषेक सोहळा:
"बत्तीस मण सुवर्ण सिंहासन, शोभले माझे शिवछत्रपती...
आकाशातून देवांनी केली, फुलांची ही पुष्पवृष्टी...
सुवर्णाक्षराने नाव कोरले, इतिहासाच्या पानावरती...
युगपुरुष तो राजा माझा, जन्मला या धरतीवरती... जी जी जी!"
१०. एकटाच लाखांना भारी..
"हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता...
अन्यायाविरुद्ध लढण्याचा, त्याचाच फक्त नाद होता...
असा माझा राजा, एकटाच लाखांना भारी होता!"
११.सह्याद्री आणि शिवराय
"दगड झालो तर सह्याद्रीचा होईल,
माती झालो तर रायगडाची होईल,
आणि जर तलवार झालो तर ती फक्त शिवरायांचीच होईल!"
शिवगर्जना (The Royal Slogan)
जेव्हा आपण ही गर्जना करतो, तेव्हा रक्तातील स्वाभिमान जागा होतो:
"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजधिराज, योगीराज, श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!"












Click it and Unblock the Notifications