Shiv Jayanti: 'रणांगण दणाणलं, सिंह गर्जला..', शिवप्रेमींसह मित्रांना पाठवा खास शिवजयंतीच्या शुभेच्छा
Shiv Jayanti 2025 : देशासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. आज मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. छत्रपती शिवरायांचे जीवन आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणा देणारे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म तिथीनुसार, 17 मार्च 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शाहाजी भोसले आणि आई जिजाबाई यांनी त्यांच्यावर अतिशय चांगले संस्कार दिले. स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणी राजांनी देखील ते प्रत्यक्षात उतरवले.
शिवरायांचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली गेले. लहानपणापासून त्यांना नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा, घोडेस्वारी अशा अनेक बाबींची शिकवण होती. याच्याच जोरावर शिवरायांनी आपल्या धाडसी आणि कुशल नेतृत्वाने मराठा साम्राज्याची स्थापना केली. चला तर शिवरायांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींना, तुमच्या मित्रपरिवाराला खास शुभेच्छा पाठवा अन् शिवरायांना अभिवादन करा...!

खालील शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही शिवजयंती सोहळा साजरा करा...!
1) शूरता हा माझा आत्मा आहे,
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे... जय शिवराय!

2) चारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा,
एकच होता असा राजा,
नाव त्याचं घेऊ किती म्हणतात त्याला छत्रपती!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
3) निधड्या छातीचा, दणकट कणांचा,
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा,
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

4) स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास,
रयतेचे सुख ही एकच मनी होती आस,
मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा,
असा वाघिणीचा होता तो छावा..!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
5) "सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे,
स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे,
छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!"
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
6) "रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं,
पराक्रमाची गाथा लिहून गेला जो,
तो एकच -छत्रपती शिवराय!" शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
7) जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवरुन मायेने हात फिरवणारा
राजा छत्रपती होता, शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
8) श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग...
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ...
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
9) महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
10) शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती,
शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा,
शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
11) अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!
12) इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
13) बीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा,
तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा,
भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा,
माय भू तुला पुत्र म्हणूनी लाभे मर्द मराठा...
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा












Click it and Unblock the Notifications