Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Shiv Jayanti 2025:शिवाजी महाराजांची यंदा तिथीनुसार जयंती कधी आहे? शिवरायांवर आधारीत सिनेमांची यादी

Shiv Jayanti 2025 Shivaji maharaj birth date as per tithi : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नुकतीच 19 फेब्रुवारी 2025 रोजी तारखेनुसार, जयंती साजरी झाली. शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनांकाबद्दल इतिहास तज्ज्ञांमध्ये वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजी महाराजांवर, त्यांच्या जीवनकार्यावर आणि विचारांवर आधारीत व्याख्याने आणि कार्यक्रम होतात.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आणि तिथीनुसार मोठ्या हर्षो-उल्हासात आणि आनंदोत्सवात जयंती कोणत्या दिवशी आणि तारखेला येते याबद्दल आज आपण जाणून घेऊया. यासह छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत असंख्य चित्रपट, नाटकांची निर्मिती झाली, रसिकांनीही या कलाकृतीला भरभरुन दाद दिली. आज आपण शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट कोणती आहेत ती जाणून घेऊया.

Shiv Jayanti 2025 Shivaji maharaj birth date as per tithi

शिवरायांची तिथीनुसार जयंती कधी आहे?

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती तीन दिवसांवर आली आहे. महाराजांची जयंती सोमवार 17 मार्च 2025 रोजी आहे. शिवरायांची किर्तीच एवढी अगाध आहे आणि त्यांचा प्रताप सूर्य, चंद्रासारखा मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होऊन गेले की, त्यांचा इतिहास अजरामर झाला आहे. त्यांच्या किर्तीवर पराक्रमावर, त्यांच्या आयुष्यातील घटनांवर आणि मावळे सरदारांसह एकूणच शिवरायांच्या जीवनावर अनेक चित्रपट, नाटके प्रदर्शित झाली आहेत. आपण आज शिवरायांवर प्रदर्शित चित्रपट कोणकोणते आहेत हे जाणून घेणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत नाटके/चित्रपट

  • आग्ऱ्याहून सुटका' (नाटक, लेखक विष्णू हरी औंधकर (1920 च्या सुमारास)
  • भंगले स्वप्न महाराष्ट्रा (नाटक, लेखक बशीर मोमीन (कवठेकर), 1975 च्या सुमारास. नाट्य झंकार ग्रुप यांनी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे व्यावसायिक नाट्यप्रयोग केले.
  • वेडात मराठे वीर दौडले सात (नाटक, लेखक बशीर मोमीन (कवठेकर), 1977 च्या सुमारास, मळगंगा नाट्यनिकेतन यांनी व्यावसायिक नाट्यप्रयोग केले.
  • छत्रपती शिवाजी आणि 21 वे शतक - व्याख्याते डॉ. गिरीश जखोटिया(2013)
  • जाहले छत्रपती शिवराय (महानाट्य : लेखक व दिग्दर्शक सुदाम तरस) (2013)
  • तीर्थ शिवराय (रंगमंचीय संगीतमय कार्यक्रम, गीते - डॉ. निखिल पाठक. संगीत - जीवन धर्माधिकारी)
  • फत्तेशिकस्त (मराठी चित्रपट - शिवाजी महाराजांच्या भूमिकेत - चिन्मय मांडलेकर दिग्दर्शक - दिक्पाल लांजेकर)
  • फर्जंद (मराठी चित्रपट - शिवाजी महाराजांच्या भूमिकेत - चिन्मय मांडलेकर, दिक्पाल लांजेकर)
  • बेबंदशाही (नाटक, विष्णू हरी औंधकर (1920 च्या सुमारास)
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (इ.स. 2009) (चित्रपट - कथा/पटकथा महेश मांजरेकर)
  • भालजी पेंढारकरांचे अनेक चित्रपट ('गनिमी कावा', "छत्रपती शिवाजी', "थोरातांची कमळा', 'नेताजी पालकर', 'बहिर्जी नाईक', "बालशिवाजी', "मराठा तितुका मेळवावा', "महाराणी येसूबाई', "मोहित्यांची मंजुळा', "स्वराज्याचा शिलेदार', वगैरे)
  • राजे आणि छत्रपती - लेखक शिवा बागुल (सप्टेंबर 2014)
  • रायगडाला जेव्हा जाग येते - नाटक, लेखक वसंत कानेटकर (2013 पर्यंत 2425 प्रयोग)
  • लाल महालातील थरारक शिव तांडव (महानाट्य -प्रमुख भूमिका अमोल कोल्हे)
  • शहाशिवाजी - लेखक य.ना. टिपणीस (1920 च्या सुमारास)
  • शिवगर्जना (महानाट्य : लेखक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत) (2012)
  • शिवरायांचे आठवावे रूप' (महानाट्य- लेखक ऋषिकेश परांजपे).
  • शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक : लेखक राजकुमार तांगडे) (2013)
  • शिवाजीच्या जीवनावरील ॲनिमेशनपट (हिंदी आणि मराठी) - अझहर खान यांच्या 'अमन अनम फिल्म प्रॉडक्शन'ची निर्मिती (ऑगस्ट 2013)
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+