वारकरी संप्रदायाला मोठा धक्का; संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांचे निधन
Shirish Maharaj More passed away : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज व प्रसिध्द व्याख्याते हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांचे आज (दि. 5 फेब्रुवारी) राहत्या घरी आकस्मिक निधन झाले आहे.
प्रखर हिंदूत्ववादी विचारवंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप शिरीष महाराज मोरे यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांच्या सहकारी व चाहत्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे यांचे बुधवारी (दि.5) सकाळी राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. पोलिस तपासाअंती सर्व चित्र स्पष्ट होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. दरम्यान, हे वृत्त कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे.
*संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले*
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 5, 2025
*मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना...*
*ॐ शांती*
*भावपूर्ण श्रद्धांजली💐*… pic.twitter.com/LI7eFPSipU
शिवव्याख्याते म्हणून शिरीष मोरे यांचा मोठा लौकीक होता. नुकताच त्यांचा विवाह देखील ठरला होता व कुंकूमतिलक समारंभ देखील झाला होता. असे असताना त्यांच्या अशा अचानक निधनाच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ माजली आहे.












Click it and Unblock the Notifications