मोठी बातमी..! एकनाथ शिंदे गटाची मंत्रीपदे ठरली; 'या' दिवशी होणार शपथविधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री सुमारे तासभर बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाला मिळणाऱ्या मंत्रीपदावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार शिंदे गटाला कॅबिनेट व राज्यमंत्रीपदासह एकूण तेरा मंत्रिपदे मिळतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

फडणवीस-शिंदे यांच्यात तासभर बैठक
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर पाच तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. याच दिवशी भाजपच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार होता, मात्र पंतप्रधान मोदींना त्या दिवशी वेळ जास्त वेळ नव्हता. त्यामुळे इतर मंत्र्यांच्या शपथविधी पुढे ढकलला. दरम्यान, सात डिसेंबरपासून विशेष अधिवेशन सुरु झालं. त्यात आमदारांचा शपथविधी पार पडला. हे अधिवेशन आता नऊ डिसेंबरपर्यंत म्हणजेच आजपर्यंत चालणार आहे. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. 'वर्षा' निवासस्थानी फडणवीस आणि शिंदेंमध्ये एक तासभर चर्चा झाली.
शिंदेंना मिळणार एकूण तेरा मंत्रिपदे
फडणवीस-शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेत शिंदे गटाला किती मंत्रीपदे मिळणार यावर चर्चा झाल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनावर या बैठकीत चर्चा झाली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती आहे.
11 डिसेंबरला होणार शपथविधी
सध्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होत आहे. यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी या नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. 7 डिसेंबरला हे अधिवेशन सुरु झालं. तर आज 9 डिसेंबरला हे अधिवेशन संपणार आहे. येत्या 16 डिसेंबरला विधिमंडळाचं हिवाळी अधिनेशन होणार आहे. मात्र त्या आधी मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तसंच 11 डिसेंबरला हा शपथविधी होऊ शकतो, असं महायुतीतीलच काही नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.












Click it and Unblock the Notifications