महत्त्वाची बातमी: शेतकऱ्यांच्या खात्यात तीन दिवसांत येणार पैसे; लाभार्थी यादी अशी चेक करा...
पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची कल्याणकाी योजना आहे. भाजप सरकारने या योजेतून आत्तापर्यंत १८ हप्ते शेतकऱ्यांच्या बॅक अकाऊंटमध्ये जमा केले आहेत. लवकरच या योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पुढील हप्ता कधी येणार याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच माहिती दिली. मात्र हा हप्ता ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे.

कधी येणार 19 वा हप्ता?
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता कधी येणार, याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, येत्या 24 फेब्रुवारीला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर असतील. त्यावेळी ते हा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा करतील. हा कार्यक्रम दुपारी 2 ते 3.30 वाजेदरम्यान होईल. त्यावेळी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
अगोदर हे करा
किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता जमा होण्यासाठी सरकारने काही गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्यांना ई-केवायसी प्रक्रिया अगोदर पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
कसे करायचे नाव चेक?
पीएम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला असेल, तर यावेळीही तो मिळेल असे नाही. त्यासाठी यावेळी लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तपासावी लागेल. शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे तपासू शकतात. शेतकरी सरकारची अधिकृत साईट pmkisan.gov.in वर जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासू शकतात. पीएम किसान योजनेतंर्गत नियमात बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल. इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे. यामध्ये अनेक बदल झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications