Navratri 2024: आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात, घटस्थापना आणि शेवटचा मुहूर्त

Navratri 2024 : शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. आजपासून शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नऊ दिवस चालणारा हा महत्वाचा उत्सव दुर्गा देवीच्या उपासनेला समर्पित आहे. या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते. या काळात उपवास, देवीच्या मंत्रांचा जप आणि दुर्गा सप्तशती पठण करण्याचीही परंपरा आहे. नवरात्रीच्या पवित्र दिवसात प्रत्येक घरात कलशाची विशेष स्थापना केली जाते.अखंड ज्योती, कन्यापूजा असे धार्मिक कार्य ही केले जातात.

नवरात्रीतील प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापनेने या उत्सवाची सुरुवात होते. घटस्थापना देखील विशेष आणि शुभ मुहूर्तावर केली जाते. त्यानंतर पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. यावेळी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असेल आणि तिथीनुसार देवीच्या कोणत्या रूपांची पूजा केली जाते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

navratri 2024

नवरात्री घटस्थापना मुहूर्त 2024

प्रतिपदा तिथीला घटस्थापनेने शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिला मुहूर्त 3 ​​ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 ते 7.31 पर्यंत असेल. या शुभ मुहूर्तात घटस्थापना करणे चुकलं असेल तर दुसरा शुभ मुहूर्त आहे, ज्याला म्हणजे अभिजित मुहूर्त म्हटलं जातं. हा मुहूर्त 12:03 ते दुपारी 12:51 पर्यंत चालणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते.

शारदीय नवरात्री 2024 चे नऊ दिवस खालीलप्रमाणे आहेत..

पहिला दिवस: 3 ऑक्टोबर 2024, माँ शैलपुत्रीच्या उपासनेचा आणि घटस्थापनेचा दिवस.

दुसरा दिवस: 4 ऑक्टोबर 2024, ब्रह्मचारिणी मातेच्या पूजेचा दिवस.

तिसरा दिवस: 5 ऑक्टोबर 2024, माँ चंद्रघंटाच्या पूजेचा दिवस.

चौथा दिवस: 6 ऑक्टोबर 2024, कुष्मांडा मातेच्या पूजेचा दिवस.

पाचवा दिवस: 7 ऑक्टोबर 2024, आई स्कंदमातेच्या पूजेचा दिवस.

सहावा दिवस: 8 ऑक्टोबर 2024, कात्यायनी मातेच्या पूजेचा दिवस.

आठवा दिवस: 10 ऑक्टोबर 2024, आई सिद्धिदात्रीच्या उपासनेचा दिवस.

नववा दिवस: 11 ऑक्टोबर 2024, आई महागौरीच्या पूजेचा दिवस.

विजयादशमी: 12 ऑक्टोबर 2024, दुर्गा विसर्जन

Disclaimer: या लेखाचा अर्थ कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा निर्माण करण्याचा नाही. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. OneIndia Marathi लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पडताळणी करत नाही, त्यामुळे कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडित यांचे मत घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+