तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला होता- शरद पवार
छत्रपती संभाजीनगर : अमित शाह यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेला आता पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे, असं उत्तर पवारांनी दिलं आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केले होते, त्या तडीपार व्यक्तीच्या हाती देशाचं संरक्षण आहे. त्यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे आहेत.अमित शाह हे जेव्हा गुजरातमध्ये होते. तेव्हा त्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आहे.

मागील काही दिवसांपासून शरद पवार आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. त्यातून अमित शाहांनी पवारांचा उल्लेख भ्रष्टाचाराचे सरदार असा केला होता. त्यानंतर शरद पवारांनीही तडीपार नेते असं म्हणत उत्तर दिलं. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका करत अमित शाहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे असं म्हटलं होतं.
काय म्हणाले होते अमित शाह ?
पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीला अमित शाह यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असतील तर शरद पवार आहेत अशी टीका केली होती. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं, असंही शाह म्हणाले होते.
शरद पवारांची यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जातं. 2014 ला भाजपा सत्तेत आली, त्यापाठोपाठ मराठा आरक्षण आलं, 2019 ला शरद पवार सत्तेत आले, पाठोपाठ मराठा आरक्षण गेलं. त्यामुळे आता काय करायचं ते तुम्ही ठरवा असं शाह यांनी म्हटलं होतं.












Click it and Unblock the Notifications