मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती खालावली; सर्व दौरे रद्द, उपचार सुरु

महाराष्ट्रातून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती खालावली असल्याची माहिती आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी आपले पुढील चार दिवसांचे नियोजित दौरे रद्द केल्याचे समजते. मात्र, त्यांना नेमका कोणता त्रास होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यांच्यावर सध्या पुण्यातच राहत्या घरी उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

Sharad Pawar

सर्व दौरे रद्द

गेले दोन दिवसांपासून शरद पवार हे सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील आयोजित कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांना बोलताना अडचण होत होती. सर्दी, खोकला त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्यामुळे शरद पवार यांच्या डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत.

नेमकं काय झालंय?

शरद पवारांचे पुढील चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आल्याची फक्त माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. फक्त डाँक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिल्याचे समजले आहे. मात्र त्यांना नेमका काय त्रास होतोय व त्यांच्यावर कुठे उपचार सुरु आहेत, याबाबत मात्र अद्याप काहीच समोर आलेले नाही.

सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात होणाऱ्या 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार नाहीत. या प्रसंगी ध्वजारोहण माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या अनुपस्थितीतही हा सोहळा साध्या पण सन्मानपूर्वक साजरा होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+