दुरावलेले जवळ आले, काका-नातू गहिरवले..! शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तचे पहा काही खास ट्विट

Sharad pawar Birthday- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस. या तरुण योद्ध्यावर सध्या देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लोकसभेतही पवारांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. या वाढदिवसानिमित्त गेल्यावर्षी सोडून गेलेले आमदारही आज पवारांना शुभेच्छा देताना दिसले. खा. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट दिल्ली गाठली. दुसरीकडे दुरावलेल्या कुटुंबातील पुतणे अजित पवार, सून खा. सुनेत्रा पवार व नातू पार्थ पवारही पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी थेट दिल्लीला गेले. आज पवारांभोवत सगळा गोतावळा जमलेला दिसला.

Sharad Pawar

पक्षाने बनवले खास ट्विट

आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार पक्षाच्या एक्स हँडलवर एक खास ट्विट करण्यात आले आहे. आज दिवसभर शरद पवारांच्या आयुष्यातील माहिती नसलेले क्षण ट्विट केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. हे ट्विट उत्सुकता वाढविणारे ठरले आहे.

अजित पवारांकडून शुभेच्छा

आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त 'एक्स'वर शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असे त्यांनी म्हटले आहे.

नातू पार्थ पवारांच्याही शुभेच्छा

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना 'एक्स' या समाजमाध्यमावर खास शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

भुजबळांकडून आरोग्यासाठी प्रार्थना

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना 'एक्स' या समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या आहे. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! या वाढदिवसानिमित्त आपल्या उत्तम आरोग्याची व दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+