भर स्टेजवर शरद पवारांचा छगन भुजबळांना गुपचूप 'मॅसेज'; 'त्या' चिठ्ठीवर नेमकं काय लिहलं, चर्चा रंगली
मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. ते अजित पवारांना सोडतील, भाजपमध्ये जातील किंवा थेट शरद पवारांकडे जातील अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आज चाकणमधील कार्यक्रमात शरद पवार व छगन भुजबळ हे दोन्ही नेते एकाच स्टेजवर आले. त्याच स्टेजवर शरद पवारांनी भुजबळांना लिहून दिलेल्या मॅसेजची आज चांगलीच चर्चा रंगली.

भुजबळांना झाला उशीर
चाकणमधील कार्यक्रमाची वेळ सायंकाळी चारची होती. या कार्यक्रमासाठी शरद पवार हे अगदी वेळेत आले. मत्र छगन भुजबळ तब्बल दीड तास उशीरा पोहोचले. वेळेच पक्के शरद पवार आपल्यावर नाराज होतील, हे भुजबळांना माहित होते. त्यामुळे एन्ट्री केल्यानंतर काही वेळ भुजबळ शांत दिसले. विशेष म्हणजे भुजबळ स्टेजवर शरद पवारांच्या अगदी शेजारी एकाच सोफ्यावर बसले. वीस मिनीटांनंतर मात्र या दोघांचे चुप्पी एका कृतीने तुटली.
पवारांनी लिहला मॅसेज
भुजबळ व पवार अगदी शेजारीच बसले होते. भुजबळ पहिले २० मिनीटे अगदी शांत दिसले. मात्र त्यानंतर शरद पवारांनी आपल्या हातातील निमंत्रण पुत्रिकेवर काहीतरी लिहिले. सोफ्याचा आधार घेत शरद पवार काही मिनिटे त्या कार्यक्रम पुत्रिकेवर काहीतरी लिहीत होते. त्यानंतर त्यांनी ती निमंत्रण पत्रिका शेजारी असलेल्या भुजबळांच्या हातात दिली व भुजबळांच्या हातातील निमंत्रण पत्रिका स्वतःकडे घेतली.
भुजबळांनी वाचला मॅसेज
पवारांन काहीतरी लिहून आपल्याला दिले, हे भुजबळांना समजले होते. त्यांनीही पवारांनी दिलेला मॅसेज गुपचूप वाचला. या सगळ्या कृतीत फक्त हे दोन नेतेच होते. याची स्टेजवरील इतरांना काहीच कल्पना नव्हती. भुजबळांनी काही सेकंद तो मॅसेज लक्षपूर्वक वाचला. त्यानंतर या दोघांनीही स्मितहास्य केले. आता तो मॅसेज नेमका काय होता, आणि दोघेही का हसले, याची चर्चा मात्र महाराष्ट्रभर रंगली आहे.
भुजबळांच्या नाराजीची चर्चा
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत. पवारांनी या पार्श्वभूमीवर भुजबळांना काही संदेश दिला का, अशीही चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले भुजबळ १५ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्यानंतर ते परदेशी निघून गेले. काही दिवसांपूर्वीच ते मायदेशी आले. आज सकाळी ते साताऱ्यातील नायगावात मुख्यमंत्र्यांसोबत एका कार्यक्रमात होते. माझा निर्णय झालेला आहे. तो योग्यवेळी जाहीर करेन, असं भुजबळांनी आजच माध्यम प्रतिनिधींना सांगितलं होतं. त्यात हे मॅसेजपुराण झाल्याने पवारांनी भुजबळांना नेमकं काय सांगितलं, हे मात्र कोडंच राहिलं.












Click it and Unblock the Notifications