काय सांगता! शरद पवार-अजित पवार पुन्हा एकत्र; पण एकमेकांकडे बघणेही टाळले
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता पुन्हा शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे एकत्र येण्याची वाट दोन्ही गटाच्या समर्थक पाहत आहे, तशा वरवर चर्चाही रंगल्या आहेत. पण आज शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र आले. निमित्त होते एका बैठकीचे पण या दोघांनी एकमेकांकडे बघणेही टाळले हे विशेष!
दुरावा कायम..2 खुर्च्या सोडून बसले
पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभेचे खासदार शरद पवार हेही उपस्थित होते. या बैठकीनिमित्त हे दोघे आज एकत्र आले. बैठकीसाठी ते आले आणि बैठक सुरु होण्यापुर्वी पाच मिनिटे आधीच ते सभागृहात त्यांच्या नियोजित जागेवर बसले होते.

...अन् अजित पवारांची एंट्री
शरद पवार आसनावर विराजमान झाल्यानंतर अजित पवार आले व ते शरद पवारांच्या खुर्चीपासून दोन खुर्च्या सोडून बसले होते. या बैठकीदरम्यान अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघणेही टाळले. तिघेही एकत्र आले पण एकमेकांशी ना बोलले ना बघितले. याची चर्चा आता रंगू लागली आहे.
बैठकीत निधीवरुन खडाजंगी
पुणे जिल्ह्यासाठीची जिल्हा नियोजन समितीची बैठकीचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले होते. त्यांनी आजच्या बैठकीला हजेरी लावली. या पूर्वी देखील महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवार यांनी अचानक डीपीडीसी बैठकीला हजेरी लावली होती.
आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मावळ आणि बारामतीला देण्यात येणाऱ्या निधीवरुन या बैठकीत रणकंदन झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघाला निधी मिळत नसल्याचे म्हटले. यानंतर बैठकीत मोठी खडाजंगी झाली.
फक्त मावळलाच निधी मिळणार का?
या बैठकीत सुनील शेळके आणि सुप्रिया सुळे यांच्यात खडाजंगी झाली. फक्त मावळलाच निधी मिळणार का, बारामतीला का नाही असा जाब सुप्रिया सुूळे यांनी विचारला. यावर सुनील शेळके यांनीही या प्रश्नावर संतप्त झाले यानंतर अजित पवारांनी उत्तर दिले.
एकत्र येण्याची शक्यता कमीच?
एकंदरीतच आज पुण्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून अजित पवार यांचे ना शरद पवार ना सुप्रिया सुळे यांच्यात संवाद झाला ना त्यांनी एकमेकांकडे बघितले. यातून सध्यातरी या दोन्ही पक्षात आणि नेत्यांत दुरावा आहे ते एकत्र येतीलच ही शक्यता तूर्त तरी सांगता येत नाही.












Click it and Unblock the Notifications