शरद पवारांचा पहिल्यांदाच दिसला रुद्रावतार; थेट मारकडवाडीत जाऊन करणार...
Sharad Pawar will visit Markadwadi- बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला मारकडवाडीच्या ग्रामस्थांना प्रशासनाने विरोध केला. त्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मतदान होऊन गेल्यावर या लोकांना बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला बंदी का? १४४ कलम का लावलंय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपण उद्या मारकडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेणार असल्याचं सांगितलं.

शरद पवार जाणार मारकडवाडीत
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'मी उद्या मारकडवाडीत जाणार आहे. तेथील लोकांशी बोलणार आहे. उत्तम जानकर यांच्यासह तेथील दोन्ही उमेदवारांच्या सभा पाहिल्या. या सभा पाहिल्यावरच निकालाचा अंदाज आला होता. मी गेल्या ४० ते ५० वर्षापासून मी सभा करतोय. सभा पाहतोय. सभा पाहिल्यावर निकाल काय लागणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज लागत नाही. वातावरण अनुकूल होतं मात्र तेथील निकाल अनुकूल नव्हता. पण मला जोपर्यंत अधिकृत माहिती समजत नाही तोपर्यंत मी ईव्हीएमवर बोलणार नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
प्रशासनाला विचारले काही प्रश्न
शरद पवार पुढे म्हणाले, 'मी आत्तापर्यंत ईव्हीएमवर संशय व्यक्त केलेला नाही. माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. मी फक्त आकडेवारी सांगितली आहे. निवडणूक होऊन गेली होती. गावच्या लोकांनी एक पद्धत अवलंबली. जुन्या पद्धतीने मतदान करावं हे त्यांनी ठरवलं होतं. त्यांना मतदान घेऊ द्यायचं होतं. बॅलेट पेपरवर त्यांना बंदी का..? कोणता कायदा आहे की लगेच त्या ठिकाणी १४४ कलम लावलं..? मला या सर्व प्रकाराचं आश्चर्य वाटलं म्हणून मी तिकडे जाऊन येणार आहे. लोकांचं मत, अधिकाऱ्यांचं मत जाणून घेणार आहे.
पुढच्या निवडणुकाही एकत्रच लढणार
शरद पवार पुढे म्हणाले की, जयंत पाटील आणि इतर काही लोकं माझ्यासोबत उद्या मारकडवाडीला येणार आहेत. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र राहणार आहोत. निवडणुकीत अप आणि डाऊन येत असतो. त्यामुळे निराश व्हायचं नसतं. मी १४ निवडणुका पाहिल्या. एवढा पराभव पाहिला नाही, पण या निवडणुकीत पराभव झाला. तरीही निराश व्हायचं नाही. लोकांमध्ये जायचं असतं. लोकांमध्ये गेलं पाहिजे.' असं ही शरद पवार सांगितलं.












Click it and Unblock the Notifications