Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? घ्या जाणून

मुंबई - उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार का? या प्रश्नाचे तूर्त उत्तर नाही हेच आहे परंतु अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का तर याचे उत्तर बहुदा हो हेही असेल. पण खरंच अजित पवार आणि शरद पवार व त्यांचे पक्ष पुन्हा एकत्र येतील का, हे आपण जाणून घेऊया.

शरद पवार यांना सोडून अजित पवार यांनी सुमारे 40 आमदार सोबत घेऊन वेगळी चुल मांडली. इतकेच काय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, चिन्हावर दावा सांगितला. निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्हही बहाल केले तर शरद पवारांना तुतारीवर समाधान मानावे लागले. हे काका-पुतणे वेगळे जरी झाले तरी ते कधीना कधी एकत्र येतील असा कयास बांधला जात आहे.

MLA Atul Benke Statement on Ajit Pawar Sharad Pawar Alliance

अजित पवारांना पाठोपाठ धक्के

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाते महाराष्ट्रातील स्थान आणि जनमत अत्यल्प असल्याचे दिसून आले. याउलट शरद पवारांच्या पक्षाला आठ जागा मिळाल्या.

त्यानंतर पुणे आणि इतर ठिकाणी अजित पवारांच्या पक्षातून शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरु झाले. या धर्तीवर आमदार अतूल बेनके हेही शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अजित पवारांना पाठोपाठ तीन धक्के बसले आहेत.

काय आहे चर्चा

चर्चा अशाही आहेत की, शरद पवार यांचे जुने सहकारी म्हणून परिचित असलेले व आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असेलेले आमदार आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अजित पवारांना सोडून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आमदार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करु शकतात. ही भिती अजित पवार यांना आहे.

एक आमदार शरद पवारांच्या भेटीला

अजित पवार यांच्या गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे आज शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यावरुन आता नवीन चर्चांना ऊत येत आहे. विशेष म्हणजे अतुल बेनके यांनी शरद पवार आणि अजित पवार हे आणि त्यांचे पक्ष एकत्र येतील, असे भाकितही केले. आता त्यांच्या या वक्तव्य कितपत खरे आहे हे मात्र अजून स्पष्ट व्हायचे आहे. त्यासाठी काही काळ लागणार आहे.

अतूल बेनके घरवापसी करणार का?

अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज शरद पवार जुन्नर, आंबेगाव, खेडच्या दौऱ्यावर आहेत.या भेटीबाबत विचारले असता, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी काम केले ते आमचे आहेत, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे, अतुल बेनकेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे काम केले का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके आता शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

बेनकेंना धोका म्हणून भेट घेतली - अजित पवार

यासंदर्भात शरद पवार यांनी स्पष्ट केले की, अतुल बेनके माझ्या मित्राचा मुलगा आहे, म्हणून त्यांनी माझी भेट घेतली. तर दुसरीकडे बेनके हे धोक्यात आल्यामुळे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षात कुठेतरी बेनके यांचे बिनसले असावे अशी शक्यता आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी हे वक्तव्य केले असावे. आगामी काळात बेनके हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील का हे पाहायचे आहे.

अजित पवार शरद पवार एकत्र येऊ शकतात

अजित पवार आणि शरद पवार नात्याने चुलते पुतणे आहे. दुसरी बाब की, सुप्रिया सुळे यांच्याशी अजित पवार यांचे छान जमते. त्यांचा एकमेकांशी चांगला स्नेहही आहे. एकमेकांचा ते आदरही करतात. घरातील व्यक्ती दूरावल्यानंतर घरी परत येतोच. त्यामुळे अजित पवार एक ना एक दिवस परत स्वगृही येतील असे अनेक जनांना वाटते.

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची ताकद दिसून आली त्यामुळे खरी राष्ट्रवादी शरद पवारांचीच आहे हे सिद्ध झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा त्यानंतर अजित पवार शरद पवारांसोबत येतील असे काहींना वाटते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+