केंद्राने दिलेल्या झेड प्लस सुरक्षावर शरद पवार यांनीच उपस्थित केली शंका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP-SP) अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचे वातावरण पाहता केंद्र सरकारने सुरक्षेची सूचना केली होती. मात्र आता केंद्रांच्या या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवार यांनीचं शंका उपस्थित केली आहे.
शरद पवार म्हणाले की, गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की, तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे. मी विचारलं तीनमध्ये इतर दोन कोण आहेत? तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव सांगितलं.
मला का सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. याची अधिक माहिती घेऊ. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांना अचूक माहिती मिळावी, म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी, अशी शंका शरद पवारांनी उपस्थित केली. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाशी संवाद साधून माहिती घेतली जाईल. त्यानंतर सुरक्षा घ्यायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. नवी मुंबईत आयोजित संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे संपूर्ण महाराष्ट्रात दौरे सुरू झाले आहेत. राज्यात मागील दिवसांपासून मराठा- ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शरद पवारांच्या दौ-यादरम्यान रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. अशा परिस्थितीत पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. केंद्रीय एजन्सींच्या धोक्याच्या मूल्यांकनाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यांनी पवारांसाठी सुरक्षा वाढवण्याची शिफारस केली होती.
सर्वोच्च दर्जाच्या सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा सीआरपीएफ व्हीआयपी सुरक्षा शाखेने हे कार्य पूर्ण करण्यासाठी आधीच एक पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. Z+ श्रेणी सर्वोच्च स्तरावरील संरक्षण कवच दर्शवते. यानंतर Z, Y+, Y आणि X सुरक्षा कव्हर आहेत. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार शरद पवार यांच्याभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. वृत्तानुसार, झेड प्लस सुरक्षा कव्हरमध्ये 55 कमांडो तैनात असतात.












Click it and Unblock the Notifications