बदलापूर घटनेमुळं महाराष्ट्राच्या नावलौकिकाला धक्का! शरद पवारांनी व्यक्त केलं 'ते' दुःख!
badalapur school girl rape case MVA Vs Mahayti :बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्यात महाविकास आघाडीने आज निषेध आंदोलन केलं. भरपावसात हे आंदोलन झालं. दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकावर निशाणा साधला आहे.बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं महाराष्ट्राच्या नावलौकिकास धक्का बसला असल्याचं त्यांनी म्हटलं आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद अवैध घोषित करत बंदची हाक दिली होती. यानंतर महाविकास आघाडीतर्फे राज्यात आज निषेध आंदोलन झालं. त्यावेळी ते बोल होते.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तिथे शरद पवार यांनी बदलापूरच्या घटनेवरून सरकारला फटकारत आपल्या कार्यकर्त्यांना महिलांचा आदर राखत त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची शपथ दिली.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, आज आपण एका अस्वस्थ करणाऱ्या घटनेसाठी एकत्र जमलो आहोत. बदलापूर येथील घटनेमुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकास प्रचंड धक्का बसला. आजच्या राज्यकर्त्यांना कोणत्याही संवेदनशील घटनेची जाण नाही. यामुळे बदलापूरचा प्रकार घडला. महाराष्ट्रात अशा अनेक गोष्टी घडल्यात. दररोज महिला व भगिनी अत्याचाराला बळी पडत आहेत.
सरकारनं संवेदनशील भूमिका घ्यावी
हे राज्य शिवछत्रपतींचे राज्य आहे. शिवछत्रपतींच्या राजवटीत अशाच एका भगिनीवर अत्याचार केला होता. त्याची तक्रार शिवाजी महाराज यांच्यापर्यंत गेली होती. तेव्हा महाराजांनी आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा दिली होती. त्यामुळे आजच्या परिस्थितीत जे काही घडत आहे, त्याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. त्यांनी संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे.
शरद पवारांनी व्यक्त केलं दुःख
शरद पवार म्हणाले, मला एका गोष्टीचे दुःख होत आहे. राज्यकर्ते व त्यांचे सहकारी बदलापूरच्या प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत. हे लोक मुलीबाळींवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याला राजकारण म्हणत असतील, राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत हे स्पष्ट होते. महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारीत आहे याची प्रचितीही त्यातून येते. महाराष्ट्रात जे काही घडले ते घडू नये अशी आमची अपेक्षा आहे
राज्यात ठिकठिकाणी आंदोलन
बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र, महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसैनिक सहभागी होते.
पुण्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. गोंदिया शहरातही महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आलं.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग









Click it and Unblock the Notifications