Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुणे ते परभणी ; राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट होतोय अधिक प्रबळ

पुणे : लोकसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभव अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारा ठरू लागला आहे. या निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या गोटात मोठ्या प्रमाणावर गळती सुरु झाली असून सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी आमदार, विद्यमान आमदार, आमदारकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार शरद पवार यांच्या झेंड्याखाली गोळा होऊ लागले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या तुलनेत शरद पवार गट विधानसभेसाठी अधिक शक्तिशाली होताना दिसून येत आहे.

Sharad Pawar and supriya sule

पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. बारामती आणि शिरूर या मतदारसंघात दोन्ही पवारांची मोठी ताकद आहे. या दोन्ही मतदारसंघातील निकालांवर पुण्याचा दादा कोण या प्रश्नाचे उत्तर मिळणार होते. आणि या दोन्ही मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चारीमुंड्या चीत करून शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली. शरद पवार गटाच्या झंझावाताची पायाभरणी या दोन मतदारसंघातूनच झाली, असे म्हणायला हरकत नाही.

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच शरद पवार यांनी झंझावाती दौरे करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या पक्षाचा वर्धापन दिन अहिल्यानगर येथे करून जंगी शक्तीप्रदर्शन केले. आणि लगोलग बारामती विधानसभा मतदारसंघ नातू युगेन्द्र पवार यांच्यासह दौरे काढून गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. बारामती विधानसभा मतदारसंघात भक्कम पायाभरणी करून अजित पवार यांना शह द्यायचा, हा चंगच थोरल्या पवारांनी बांधला.

पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड मतदारसंघावर अजित पवार यांचा वरचष्मा आहे. या शहराच्या जडणघडणीत अजित पवार यांनी योगदान दिले आहे. तिथेच अजित पवार यांच्या शहर अध्यक्षांसह माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या गटात दाखल झाले. अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. हा धक्का पचतो न पचतो तोच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. बारामती, पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुणे जिल्ह्यात शरद पवारांनी आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली.

अल्पसंख्याक मते हा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पक्षासाठी महत्वाचा मुद्दा आहे. अल्पसंख्याक नेते आपल्याकडे असावेत अशी प्रत्येक पक्षाची धडपड असते. अजित पवार यांच्याकडे कोल्हापुरात हसन मुश्रीफ, परभणीमध्ये बाबाजानी दुर्रानी, ठाण्यात नजीब मुल्ला आणि मुंबईत बाबा सिद्दिकी तसेच नबाब मलिक असे अल्पसंख्याक नेते अजित पवार यांच्याकडे होते. त्यातील बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे ते परभणी अशी गळती लागलेली असतानाच सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, सांगली येथेही शरद पवार यांची राष्ट्रवादी आपली पाळेमुळे घट्ट करू लागला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांच्या तुतारीचा गजर होण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे राज्यभरात थोरल्या पवारांकडे ओघ वाढू लागला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लागलेली गळती विधानसभेपर्यंत महापुरात बदलण्याची शक्यता आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+