काल दादा भावूक झाले अन् आज शरद पवारांनी अजित दादांची केली नक्कल; बारामतीत नेमकं काय घडलंय
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अशातच बारामती मतदारसंघाची चर्चा देखील चांगलीच रंगलेली आहे. कारण या ठिकाणी काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. काल अर्ज भरताना अजित पवार हे भावूक झाले होते. तर आज शरद पवार यांनी अजित दादांना जोरदार टोला लगावत त्यांच्या रडण्याची नक्कलच केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून पुतण्यास वरचढ काका ठरला अशी देखील चर्चा होऊ लागली आहे.
नेमकं काय घडलंय बारामतीत?
बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. काल अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवार यांच्यावर आरोप केले. माझ्याकडून चूक झाली, तशीच चूक आता ते देखील करत आहे, त्यांना या गोष्टी समजायला हव्यात. त्या आरोपाला आता शरद पवार यांनी नक्कल करत जोरदार टोला लगावला. शरद पवार यांनी डोळ्यावरील चष्मा काढला, तसेच डोळे देखील पुसले. त्यामुळे सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

युगेंद्र पवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
अजित पवार यांच्या विरुद्ध युगेंद्र पवार हे मैदानात उतरले आहेत. प्रचारासाठी शरद पवार यांच्या सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. या सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार निवडणुकीला उभ्या होत्या. त्यावेळी शरद पवार येतील आणि भावनिक आवाहन करतील, असे त्यांनी म्हटले होते. मात्र आता ते भावनिक बोलत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. इतकेच नाही तर या वेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांची नक्कल देखील केल्याने सभास्थानी एकच हशा पिकला.
मला घर फोडायला शिकवले नाही
काही लोकांनी आमच्यावर खटला केला. आयुष्यात ती कधीही कोर्टात उभा राहिलो नव्हतो. मात्र त्यांच्यामुळे मला त्याला सामोरे जावे लागले. माझ्या नावाने समन्स आले. मला घर फोडायला कोणीही शिकवले नसल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात होणारी पवार विरुद्ध पवार निवडणूक आता चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांनी केलेल्या सर्व आरोपांना शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते अजित पवार
माझ्या आईने सांगितल्यानंतर देखील माझ्या विरोधात शरद पवार यांनी उमेदवार दिला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. लोकसभा निवडणुकीत जी चूक मी केली तीच चूक आता त्यांनी केले असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले होते. या माध्यमातून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्याला शरद पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.












Click it and Unblock the Notifications