Sharad pawar health update : शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुण्यातील रुग्णालयात होणार दाखल

Sharad pawar health update : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना सतत अशक्तपणा जाणवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांपूर्वीच ते उपचार घेऊन रुग्णालयातून घरी परतले होते.

Sharad pawar health update

प्रकृतीबाबतची ताजी अपडेट

'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला असून, त्यांना सलाईन लावले जाण्याची शक्यता आहे. अशक्तपणा वगळता त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी छातीत कजेशन जाणवत असल्याने त्यांना बारामतीवरून पुण्याला आणण्यात आले होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते, मात्र पुण्यात विश्रांती घेत असताना त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला आहे.

'या' पुर्वीही बिघडली होती प्रकृती

शरद पवार यांना 9 फेब्रुवारीदरम्यान, तीव्र खोकला, घशात इन्फेक्शन आणि ताप भरल्यामुळे त्रास झाला होता. बारामतीमध्ये असतानाच त्यांना हा त्रास जाणवू लागल्याने तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाढत्या वयामुळे निर्माण झालेला थकवा आणि ऋतू बदलाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला होता, डॉक्टरांनी त्यांच्या छातीचा एक्स-रे आणि रक्ताच्या काही चाचण्याही केल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीय अत्यंत कठीण प्रसंगातून जात होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले व ९ फेब्रुवारी रोजी त्यांचा 'तेरहवी' (पुण्यस्मरण) विधी बारामतीतील काठेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या दुःखद घटनेचा मोठा मानसिक धक्का आणि व्यस्त वेळापत्रकामुळे पवार यांची तेव्हा प्रकृती बिघडली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+