शरद पवार गटाची चौथी यादी जाहीर; काटोलमधून अनिल देशमुखांची माघार, मुलाला दिले तिकीट, वाचा यादी

NCP Sharad Pawar Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चौथ्या उमेदवार यादीत एकूण 7 उमेदवारांचा समावेश आहे.

काटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत. तर चौथ्या यादीत माण, काटोल, खानापूर, वाई, दौंड, पुसद, सिंदखेडा, या मतदारसंघांचा देखील समावेश आहे.

Maharashtra assembly election 2024

4थ्या यादीतील उमेदवारांचे नावं

  • माण - प्रभाकर घार्गे
  • काटोल- सलील अनिल देशमुख
  • खानापूर- वैभव सदाशिव पाटील
  • वाई- अरुणादेवी पिसाळ
  • दौड- रमेश थोरात
  • पुसद- शरद मेंद
  • सिंदखेडा- संदीप बेडसे

काटोलला उमेदवार बदलला

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. रश्मी बर्वे यांच्याप्रमाणं माझ्या उमेदवारीमध्ये अडथळा आणण्यासाठी दिल्लीतून मोठे वकील आल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केलेला आहे. अनिल देशमुख यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या जागी सलील अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+