Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांना जोर का झटका! 'या' निष्ठावंत नेत्याने सोडली 40 वर्षांची साथ; दादांचे नेतृत्व स्वीकारले!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, राजकीय पक्षांतराच्या हंगामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज (मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५) मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

शरद पवार यांचे चार दशकांपासूनचे जिवलग सहकारी, माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अरुण गुजराती यांनी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sharad Pawar gets a shock

अरुण गुजराती: शरद पवारांचे चार दशकांचे निष्ठावंत शिलेदार!

अरुण गुजराती हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नाव असून, त्यांची ओळख शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान सहकारी म्हणून होती. त्यांनी काँग्रेस पक्षातून शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाशी घट्ट जोडले गेले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत.

सकाळी भेट, संध्याकाळी पक्षप्रवेश

अरुण गुजराती यांनी आज सकाळी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ४० वर्षांचा राजकीय प्रवास संपवण्याबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली, "शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला. ज्यांनी मला मोठं केलं ते शरद पवार आणि ज्यांनी मला पुढे आणलं ते माझे कार्यकर्ते. दोघांच्या मध्ये मी सँडविच झालो होतो. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला."

अरुण गुजराती आज संध्याकाळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (MAVIM) कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

कार्यकर्त्यांचा दबाव ठरला निर्णायक कारण

अरुण गुजराती यांच्या या महत्त्वाच्या पक्षबदलामागे कार्यकर्त्यांचा दबाव निर्णायक ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर चोपड्यात अरुण गुजराती यांच्या समर्थकांमध्ये मोठी फूट पडली होती. काही कार्यकर्ते भाजपामध्ये तर काही इतर पक्षांमध्ये गेले होते. गुजरातींच्या कार्यकर्त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, "तुम्ही अजित पवार यांच्यासोबत गेलात, तर आम्ही तुमच्यासोबत राहू, नाहीतर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे." यामुळे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांची संघटनात्मक ताकद कायम राखण्यासाठी अरुण गुजराती यांना अखेर अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

चोपड्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार!

अरुण गुजराती यांच्या या प्रवेशामुळे चोपडा परिसरात अजित पवार गटाला स्थानिक स्तरावर मोठी राजकीय बळकटी मिळणार आहे. गुजराती यांची चोपडा परिसरात चांगली संघटनात्मक पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर येथे शरद पवार गट कमकुवत झाला होता. राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे, या राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार गटासाठी हा प्रवेश 'प्रतिष्ठेचा' मानला जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+