बारामतीत पुन्हा काका-पुतण्यांची लढाई! अहेरीत मुलीविरुद्ध वडिल लढत! हे आहेत शरद पवारांचे 45 शिलेदार
Sharad Pawar Candidate List Baramati Ajit Pawar vs Yugendra Pawar : महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीतील घटक पक्ष एक एक करुन आपली यादी जाहीर करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली. बारामतीत युगेंद्र पवार यांना शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या काका-पुतण्यांची लढत पाहायला मिळणार आहे.
तर दुसरीकडे धर्मरावबाबा आत्राम हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अहेरीत विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळाले आहे. त्यामुळे अहेरीत आता मुलीविरुद्ध बाप असा सामना रंगणार आहे.

काका विरुद्ध पुतण्या
आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली. यात बारामतीत पुन्हा लोकसभा निवडणुकीतील ती रंगत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नणंद विरुद्ध भावजयी हा सामना बारामती लोकसभा निवडणुकीत रंगला आणि अजित पवार यांच्या पत्नीला पराभव स्विकारावा लागला. तिथे सुप्रिया सुळे या निवडून आल्या, आता पुन्हा बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा सामना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी रंगणार आहे.
धर्मराव आत्राम आणि अहेरी हे समिकरण
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत, त्यापैकीच एक म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे राजकीय दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे युती असो की आघाडी, या दोघांनीही अहेरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते.
वडीलांविरुद्ध मुलगी
आत्राम यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केला पण त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे आत्राम यांचे राजकीयदृष्ट्या घरात खिंडार पडले आहे. कुटुंबातील ह्या विभाजनामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.आता नवीन समिकरणे काय असतील आणि बाप लेकीपैकी कोण अहेरीचा गड राखणार हे येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची यादी
- जयंत पाटील - इस्लामपूर
- अनिल देशमुख- काटोल
- राजेश टोपे- घनसावंगी
- बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
- जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
- शशिकांत शिंदे - कोरेगाव
- जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
- गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
- हर्षवर्धन पाटील- इंदापूर
- प्राजक्त तनपुरे -राहुरी
- अशोकराव पवार- शिरुर
- मानसिंगराव नाईक- शिराळा
- सुनील भुसारा- विक्रमगड
- रोहित पवार- कर्जत जामखेड
- विनायकराव पाटील- अहमदपूर
- राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
- सुधाकर भालेराव- उदगीर
- चंद्रकांत दानवे- भोकरदन
- चरण वाघमारे- तुमसर
- प्रदीप नाईक- किनवट
- विजय भांबळे-जिंतूर
- पृथ्वीराज साठे- केज
- संदीप नाईक- बेलापूर
- बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
- दिलीप खोडपे- जामनेर
- रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
- सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
- रविकांत बोपछे- तिरोडा
- भाग्यश्री अत्राम- अहेरी
- बबलू चौधरी- बदनापूर
- सुभाष पवार- मुरबाड
- राखी जाधव- घाटकोपर पूर्व
- देवदत्त निकम- आंबेगाव
- युगेंद्र पवार - बारामती
- संदीप वर्पे- कोपरगाव
- प्रताप ढाकणे- शेवगाव
- राणी लंके- पारनेर
- मेहबूब शेख- आष्टी
- करमाळा-नारायण पाटील
- महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
- प्रशांत यादव- चिपळूण
- समरजीत घाटगे - कागल
- रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
- प्रशांत जगताप -हडपसर












Click it and Unblock the Notifications