पक्षप्रवेशात धक्क्यांवर धक्के..! आणि हर्षवर्धन पाटलांचे नंतर शरद पवारांचे..
इंदापूर येथे आज (सोमवारी) हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटात प्रवेश झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते, शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांच्यासह पक्षातील अनेक मोठे नेते यावेळी उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांना पक्षात सहभागी करून घेतलं. या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील व शरद पवारांनी केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा झाली.
सुळेंच्या विजयात माझाही वाटा- पाटील
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मतफरकाने पराभव केला. दरम्यान, "सुप्रिया सुळे यांच्या या विजयात आमचाही अप्रत्यक्ष सहभाग होता", असं वक्तव्य माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं. वास्तविक, लोकसभा निवडणुकीच्यावेळी हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये होते. परंतु तरीही त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यात हातभार लावला होता. पाटील यांच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे सुप्रिया सुळे चार वेळा खासदार झाल्या आहेत. आधी तीन वेळा जेव्हा त्या खासदार झाल्या, त्यावेळी त्यांच्या विजयात थोडंफार का होईना, आमचंही प्रत्यक्ष योगदान होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता. हर्षवर्धन पाटलांच्या यावा वक्तव्यानंतर उपस्थितांनी हसून दात दिली.
शरद पवारांनी तर उमेदवारच जाहीर केला
हर्षवर्धन पाटील यांच्या बाँम्बनंतर, शरद पवारांनीही आपल्या स्टाईलने पक्षप्रवेशाची ही सभा गाजवली. अद्याप महाविकास आघाडीचं जागावाटप झालेलं नसताना शरद पवारांनी इंदापूरातल्या थेट उमेदवाराचं नावच जाहीर केलं. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे आल्याचं आता निश्चित झालं. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थितांना जाहीर आवाहन करताना शरद पवारांनी "यांना तु्म्ही विधानसभेत पाठवा", असं सांगत अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे, अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, हेच स्पष्ट केलं. त्यामुळे आता यासंदर्भात राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications