शहाजीबापू पाटील; अस्सल गावरान आणि निखळ राजकारणी; सांगोल्यातून तिसऱ्या विजयासाठी रिंगणात
आपल्या महाराष्ट्राला अस्सल ग्रामीण भाषेत बोलणाऱ्या रांगड्या पण सच्चा राजकारणांची मोठी परंपरा लाभली आहे. गावरान भाषेत बोलणारे हे नेते ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेतात. त्यांच्या भाषणातली बोलीभाषा लोकांना भावते. आपलंसं करून घेते. या भाषेच्या जोरावरच अनेक नेते राज्याच्या कानाकोपऱ्यात स्वतःचा लौकिक पसरवतात. अशा अस्सल गावरान राजकारण्यांपैकी एक म्हणजे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील.
स्थूल देह, चेहऱ्याला शोभून दिसणारी दाढी, आक्रमक आणि रांगडी भाषा, खुमासदार टीका करण्याची शैली, आणि जे मनात तेच ओठात बोलून दाखवण्याचा स्वभाव ही शहाजी बापूंच्या राजकारणाची वैशिष्ट्ये. वकिलीची पदवी पदवी असलेले शहाजीबापू गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याचे राजकारणात कार्यरत आहेत.

सांगोला हा पश्चिम महाराष्ट्रातील तसा दुष्काळी तालुका. कष्टकऱ्यांचा तालुका अशी सांगोल्याची ओळख आहे. प्रचंड मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलवणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगोल्याचे नाव महाराष्ट्रभरात नेले आहे. शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला हा बालेकिल्ला. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख यांनी शेकापकडून हा किल्ला अनेक वर्ष शाबूत ठेवला. त्यांच्याशी टक्कर घेत घेत राजकारणात पुढे आलेला नेता म्हणजे शहाजी बापू पाटील.
1995 साली पहिल्यांदा विधानसभेत
1995 मध्ये शहाजीबापू काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत गेले. त्यानंतर अनेक पराभव पचवत पचवत 2019 साली शिवसेनेच्या तिकिटावर सांगोला वासियांनी त्यांना आणखी एक संधी दिली .कोणतीही मोठी महत्त्वाकांक्षा नसलेल्या शहाजी बापूंनी आपल्या साध्या आणि सरळ स्वभावाने नेत्यांना जिंकून घेतले. 2022 साली जून महिन्यात विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला आणि तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटीला निघून गेले. शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. बंडाच्या त्या काळात आपल्या एका विशिष्ट संवादामुळे शहाजीबापू पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या चर्चेत आले. आणि त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
सांगोल्याच्या विकासासाठी भरीव निधी
सांगोला तालुका पायाभूत सुविधांच्या बाबतीत फारसा पुढारलेला नाही. किंबहुना वेळोवेळी सत्तेत असलेल्या राजकारण्यांनी सांगोल्याच्या विकासाकडे सपशेल दुर्लक्ष केले. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा बहुगुणी नेता लाभल्यामुळे शहाजीबापू पाटील यांना आपल्या तालुक्याच्या आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी घेता आला. वेळोवेळी झालेल्या सभांमध्ये शहाजीबापू पाटील यांनी त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.
पाणीपुरवठा योजनांवर विशेष भर
पाण्याचे दुर्भिक्ष ही सांगोला विधानसभा मतदारसंघाची सर्वात प्रमुख समस्या आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे येथील शेतकऱ्यांना रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतर करावे लागते. येथील शेतजमिनी ओसाड पडल्याचे दाखले शहाजी बापूनी अनेकवेळा दिले आहेत. त्यामुळे या भागात पाण्याची उपलब्धता झाली तर आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम होईल हे शहाजी बापू पाटील यांनी ताडले आणि पाण्याचा उपलब्धतेसाठी आपल्या नेतृत्वाकडे यशस्वी पाठपुरावा केला. त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर झालेल्या विविध योजनांमध्ये पाणीपुरवठा योजनांचा सर्वाधिक समावेश आहे हे त्यांच्या दूरदर्शीपणाचे निदर्शक आहे
बाळासाहेब ठाकरे सिंचन प्रकल्पाला ८८३ कोटी
शहाजी बापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सांगोला उपसा योजना म्हणजेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना प्रकल्पाला 883 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सांगोला तालुक्यातील बारा खेड्यांना याचा लाभ होणार असून 40 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच निरा उजव्या कालव्यातून गेट क्रमांक चार आणि पाच मधून सांगोल्यासाठी दोन टीएमसी अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले आहे.
म्हैसाळमधूनही पाणी
ताकारी म्हैसाळ आणि टेंभू या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सिंचन योजना आहेत. म्हैसाळ जलसिंचन योजनेतून सांगोल्यासाठी 0.३५ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. तालुक्यातील आठ गावांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच टेंभू जलसिंचन योजनेतून १.६०० टीएमसी पाणी शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यासाठी मंजूर करून घेतले आहे. माण नदी परिसरातील १९ खेड्यांना याचा लाभ होणार आहे. तीन आवर्तनांना शहाजी पाटील शहाजी बापू पाटील यांनी मंजुरी मिळवून घेतली आहे.
शिरभावी पाणी पुरवठा योजनेला ८०० कोटी
शिरभावी पाणीपुरवठा योजना ही सांगोलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना आहे .जल जीवन योजनेच्या अंतर्गत शहाजीबापू पाटील यांनी या प्रकल्पासाठी 800 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. सांगोला तालुक्यात मध्यवर्ती इमारत आणि बायपास करिता शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यातून 22 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मुस्लिम समुदायाकरिता इदगाह मैदानासाठी 13 कोटी रुपयांचा निधी शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. सांगोला माहूड रस्त्यासाठी त्यांनी 225 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. सांगोला शहरात सांडपाणी व्यवस्थापनासाठी एक योजना त्यांच्या पुढाकारातून मंजूर करून घेण्यात आली असून त्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
शहाजी बापू विरुद्ध दीपक आबा
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून सांगोला विधानसभा मतदारसंघात पुन्हा शहाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून दीपक आबा साळुंखे मैदानात उतरत आहेत. शेकापसा एकीकडे बालेकिल्ला असलेल्या सांगोला तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर, केलेल्या कामांच्या पाठवाने आणि महायुतीच्या ताकतीने शहाजीबापू पुन्हा विधानसभेत जातील असा विश्वास महायुतीचे सांगोल्यातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.












Click it and Unblock the Notifications