ठाकरे गटाच्या खासदारांची व आमदारांची तातडीने स्वतंत्र बैठक; कारण नेमकं काय? महत्त्वाची माहिती समोर
सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरु आहे. ठाकरे गटाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व नेते शिंदे गटात दाखल झाले. आगामी काळातही ठाकरे गटाची मोठी पडझड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिच शक्यता लक्षात घेऊन ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी, त्यांच्या पक्षाच्या आमदारांची व खासदारांची स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरवले आहे.

शिवसेनेची पडझड सुरुच
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात बैठक घेतली. त्यात ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. माजी आमदार राजन साळवी यांनीही ठाण्याला जात मागील आठवड्यात शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. आता कोकणात ठाकरे गटाचे फक्त भास्कर जाधव हे एकमेव आमदार शिल्लक असल्याने ठाकरे गटात चिंता पसरली आहे. जाधव यांनीही दोन दिवसांपूर्वी आपल्याला योग्य संधी मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत ठाकरे गटाचे टेन्शन वाढवले आहे.
उद्धव ठाकरे यांचा निर्णय
ठाकरे गटाची पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे हे अँक्टीव्ह झाले आहेत. ठाकरे गटाच्या आमदार व खासदारांची स्वतंत्र बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या खासदारांची येत्या 20 फेब्रुवारीला, तर आमदारांची 25 फेब्रुवारीला बैठक होणार आहे. या खासदार- आमदारांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी बोलवली आमदार खासदारांची बैठक, महत्त्वाची ठरणार आहे.
आदित्य ठाकरेंचीही बैठक
दरम्यान, अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक होणार आहे. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यां बैठकीत विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 20 तारखेला खासदार आणि 25 तारखेला आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे शिवसेना भवन येथून आदेश देण्यात आले असल्याचे सूत्रांची माहिती.












Click it and Unblock the Notifications