प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवा,पीएमओ कार्यालयाकडून आदेश
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांबाबत रोज नवी प्रकरणे समोर येत आहेत. त्यात या प्रकरणाची थेट पीएमओ कार्यालयाने दखल घेतली असून पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवा, असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे.

याशिवाय पूजा खेडकर हिचे दिव्यांग व ओबीसी प्रमाणपत्राची चौकशीही करण्यात येणार आहे. दरम्यान, वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल करण्यात आला आहे. तसेच, आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वनविभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणाचा काळ घालवावा लागणार आहे.
पीएमओ कार्यालयाने मागवला अहवाल
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या सर्व प्रकरणाची दखल थेट पीएमओ कार्यालयाने घेतली. पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवा, असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. थेट पीएमओ कार्यालयाने अहवाल मागवल्याने आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पूजा खेडकर यांचे दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासले जाण्याची शक्यता आहे.
शिक्षणातही केला गोलमाल?
पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. त्यासाठी सन २००७ मध्ये त्यांनी ओबीसी भटक्या जमाती- ३ या कोट्यातून प्रवेश घेतला. विशेष म्हणजे वडील आयएएस अधिकारी असताना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र या प्रवेशासाठी त्यांनी जोडले. त्यावेळी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्न मर्यादा साडेचार लाख होती. मग त्यांना त्यावेळी हे प्रमाणपत्र कुणी दिले, हा प्रश्न आहे. शिवाय पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले. त्या कोट्यातून त्यांना नोकरी मिळाली. परंतु वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिले नाही. मग यूपीएससी परीक्षा देतानाच त्यांना अपंगत्व आले होते का..? असा प्रश्न आता विचारला जावू लागला आहे.
खेडकर कुटुंब सापडेना
पुणे ग्रामीण पोलिसांकडून खेडकर कुटुंबाचा शोध सुरू करण्यात आला आहे. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. खेडकर कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार करण्यात आल्याचीही माहिती आहे. पौड पोलिसांचं एक पथक खेडकर यांच्या घरी आज येऊन गेल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. पूजा खेडकर यांनी खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासनचा बोर्ड लावला. तसेच त्या गाडीला अंबर दिवा लावला. यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. तो दंड या कुटुंबाने भरला आहे.
आईवरही गुन्हा दाखल होणार?
मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबानं कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलीस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांनी पिस्टलने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलीस यासंदर्भात मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी आले होते.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications