Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खोक्या भोसलेचे घर वनविभागाने बुलडोझरने पाडले; घरात सापडलेल्या 'त्या' पिशवीबाबत चर्चा वाढल्या

बीड जिल्ह्यातील नवा गुंड खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या घरावर आज बुलडोझर फिरवण्यात आला. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे आता वनविभागाने ही कारवाई केली. या आधी वनविभाने नोटिस पाठवली होती. पण 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खोख्या उर्फ सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. दरम्यान, वनविभागाने त्याच्या घरातील सामान एका टॅक्टरमध्ये भरले. ते सामान भरताना वनविभागाच्या अधिकाऱ्याना एक पिशवी सापडली. त्या पिशवीत नेमकं काय आहे आणि वनविभागाने ती ताब्यात का घेतली, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Khokya Bhosale s house demolished

घरावर वनविभागाचा बुलडोझर

खोक्याचं घर पाडण्यापूर्वी त्यातील सामान एका ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आले. खोक्याच्या घरातील सामान बाहेर काढत असताना त्याच्या घरामध्ये वनविभागाला एका पिशवी सापडली. वनविभागाने त्याच्या घरातील इतर सामान ट्रॅक्टरमध्ये ठेवलं, मात्र ती पिशवी वेगळी ठेवण्यात आली. या पिशवीमुळे आता या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. या पिशवीमध्ये नेमकं काय आहे? हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये. मात्र या पिशवीत काही तरी महत्त्वाची गोष्ट असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घरात सापडले शिकारीचं घबाड

खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वनविभागाने धाड टाकली होती. त्यावेळी धारदार शस्त्रं, जाळी, वाघूरसह आणि अनेक गोष्टी वनविभागाला आढळून आल्या. प्राण्यांचे मांस देखील पोलिसांना आढळले. खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच, हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये मोठा हरणांचा कळप आहे, आणि या कळपाला संपवण्याचे काम सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या गँगने केले आहे, असा आरोप आहे.

खोक्याला प्रयागराजमध्ये अटक

महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीवरून प्रयागराज पोलिसांनी सतीश भोसले यांना अटक केली. पोलिस चौकशीदरम्यान सतीश भोसले यांनी सांगितले होते की ते औरंगाबादहून बसने प्रयागराजला आले होते. त्याला प्रयागराजहून अयोध्येला जायचे होते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात २९ वर्षीय सतीश भोसले यांच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल आहेत. मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार सतीश भोसले उर्फ ​​खोक्या याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि एनडीपीएस कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. सतीश भोसले यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी ६०,००० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त केला.

खोक्या भाजपचा पदाधिकारी

सतीश भोसले उर्फ ​​खोक्या हे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. मारहाणीच्या एका प्रकरणानंतर सतीश भोसले प्रसिद्धीच्या झोतात आला. वन विभागाच्या छाप्यादरम्यान, आरोपी सतीशच्या घरातून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. सतीशवर वन्य प्राण्यांना मारून त्यांचे अवशेष घरी ठेवल्याचाही आरोप आहे. खोक्या भोसले हा भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा एक पदाधिकारी असल्याचेही सांगितले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+