Satbara correction : खूशखबर! सातबारा दुरुस्ती गावातच होणार! कधीपर्यंत संधी, 'ही' कागदपत्रं जवळ ठेवा

Satbara correction : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यातील चुकांची महसूल विभाग गावातच दुरुस्त्या करुन देणार आहे. खास बाब म्हणजे महसूल विभाग महसूल संबंधीत सेवा पंधरवाडा मोहिम हाती घेत आहे, या मोहिमेअंतर्गत गावातच सातबारा दुरुस्ती केली जाणार आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त दिले आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर गांधी या काळात हा पंधरवाडा राबवला जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच सातबारा दुरुस्ती करुन मिळणार आहे.

Satbara correction

काय आहे महसूल विभागाची मोहिम?

महसूल विभागाच्या मोहिमेत महसूल अधिकारी थेट गावात जाऊन शेतकऱ्यांचे सातबारा उतारे तपासणार आहेत, त्यात दुरूस्तीही ते करुन देणार आहेत.

या मोहिमेचा हा फायदा

बऱ्याचदा सातबारा दुरुस्तीसाठी किंवा नोंदी मिळवण्यासाठी तालुका स्तरावरील कार्यालयात तसेच मंडळाच्या तलाठी कार्यालयात फेरे मारावे लागतात. या कामासाठी नागरिकांना फेऱ्या मारण्याची या काळात गरज राहणार नाही व त्यांचा वेळ, येण्याजाण्याचा पैसा वाचेल.

Take a Poll

ही मोहीम कशासाठी?

अनेकांच्या सातबारामध्ये चुका असतात. त्यामुळे अनेकांची कामे रखडतात. त्यासाठीचे प्रलंबित अर्ज आणि नोंदणी पत्रातील त्रुटी यांचा गावपातळीवरच निपटारा करता येईल. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ नुसार, आदेशाची तपासणी करुन सातबारामध्ये सुधारणा करता येणार आहे. महसूल विभागाचे अधिकारीच दारी येणार असल्याने नागरिकांना घरबसल्या सुविधा या पंधरवाड्यात मिळणार आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! तुकडेबंदी उठणार, एक गुंठा जमीनीचाही तुकडा पाडता येणार; सरकार आणणार नवा गुंठेवारी कायदा!

शेतकऱ्यांसाठी काय आहेत सुचना?

  • जमीनीची मुळ सर्व संबंधिक कागदपत्रे जवळ ठेवा.
  • मोहिमेदरम्यान गावात महसूल अधिकारी आल्यावर गावात महसूल अधिकारी आल्यास त्यांच्याकडे तत्काळ अर्ज आणि तक्रारी सादर कराव्यात.
  • दुरुस्ती झाल्यानंतर सातबारा उतारा नीट तपासावा, नोंदी योग्य आहेत का हे पडताळा. पंधरवाड्यात येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्या सातबारात दुरुस्त्या करुन घ्याव्या.

ही कागदपत्रे सोबत ठेवा

  • अर्जाचा नमूना
  • जमिनीचा जुना सातबारा (असल्यास.. )
  • हक्कपत्र किंवा खरेदीखत अथवा विक्रीखत
  • नोंदणी कार्यालयातील नोंद
  • वारस प्रमाणपत्र अथवा आठ अ चा उतारा (हा वारस नोंद करण्यासाठी लागतो.)
  • जमीनीचा फेरफार अर्जाची प्रत (आधीच्या फेरफार क्रमांकासह)
  • रहिवासी दाखला (स्थानिक रहिवासी व जमिनीचा मालक आहे यासाठी)
  • आधार, पॅनकार्ड,मतदानकार्ड यापैकी एक पुरावा

हेही वाचा : नव्या गुंठेवारी कायद्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार? फक्त 3 मुद्यात सोप्या भाषेत समजून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+