संतोष देशमुख यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे केली महत्त्वाची मागणी; मोर्चात सर्व कुटुंब सहभागी
सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज सिंदखेड राजा येथे सकल मराठा समाजाकडून मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले. या मोर्चाच्या वेळी संतोष देशमुख यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना लाडकी बहिण म्हणून केलेली एक विनंती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

मोर्चात देशमुख कुटुंब सहभागी
मराठा समाजाच्यावतीने आयोजित या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंब सहभागी झाले आहे. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "आरोपीला लवकर अटक झाली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे. पण तुम्ही जे नाव घेताय त्याबाबत मला काही माहिती नाही", असे म्हणत वैभवी देशमुख हिने वाल्मिक कराड यांचे नाव घेणे टाळले.
पत्नीची मुख्यमंत्र्यांना विनंती
यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नीने एक मोठी मागणी केली. प्रसारमाध्यामांशी बोलताना त्या म्हणाल्या की, "वाल्मिक कराडबाबत मला माहीत नाही. पण मुख्यमंत्र्यांना या लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक करा. त्ंयांना शिक्षा करा लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री न्याय मिळवून देतील विश्वास आहे", असे संतोष देशमुख यांची पत्नी म्हणाल्या. संतोष देशमुख यांच्या मुलानेही आम्हाला न्याय मिळून दिला जाईल", अशा विश्वास व्यक्त केला.
मोर्चात सकल मराठा समाज सहभागी
या मोर्चात सकल मराठा समाज सहभागी झाला आहे. संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान हे प्रकरण आता सर्वांनीच उचलून धरल्याने पोलिसांसमोर आरोपींनी तातडीने अटक करण्याचे आव्हान आहे












Click it and Unblock the Notifications