उज्ज्वल निकमांनी 32 मिनिटांत मांडला धक्कादायक हत्यापट; वाचा, न्यायलयात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड येथील मकोका न्यायलयात सुरु आहे. या खटल्यात आज प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच युक्तीवाद केला. या युक्तीवादात अॅड. निकम यांनी सीडीआरचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. या संपूर्ण हत्याकांडाची माहिती त्यांनी न्यायालयासमोर मांडली.

नेमके काय झाले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुरु झाली. सर्व आरोपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तीवाद सुरु झाला. युक्तीवादात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ही केस चार्ज फ्रेम करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु आरोपीच्या वकिलांनी कागदपत्रे न मिळाल्याचे कारण सांगत चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली.
उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद
अॅड. उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर ३२ मिनिटांचा युक्तीवाद केला. त्यात त्यांनी खंडणी, अपहरण, मारहाण आणि हत्या हा सगळा घटनाक्रम न्यायालयाला सांगितला. वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला बैठका झाल्या होत्या. या सगळ्या गोष्टी पोलिसांनी आरोपपत्रात मांडल्या होत्या. परंतु पोलिसांच्या चार्डशीट मध्ये एक गोष्ट नव्हती. ती म्हणजे सीडीआर. हाच सीडीआरचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयात मांडला. सीडीआरचा महत्त्वाचा मुद्दा हा आरोपपत्रापेक्षा वेगळा आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, कृष्णा आंधळे याने फरार असताना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला ३ वेळा फोन केला होता. हा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. या सीडीआर रिपोर्टमुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा थेट सहभाग असल्याचं समोर आले आहे.
युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे
१. नांदूर फाटा येथील हॉटेल 1 डिंसेबरला तिरंगा येथे वाल्मिक कराडसह आरोपींची बैठक झाली.
२, संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने मार्गदर्शन केले.
३. सीडीआर रिपोर्टमधून गँग लिडर सुदर्शन घुले तर घटनेचा गाईड वाल्मीक कराड आहे.
४. फरार असताना आरोपी कृष्णा आंधळेने वाल्मीक कराड व विष्णू चाटेला तीन वेळा फोन केला. हे सीडीआरमध्ये समोर आले.
५. आवादा कंपणीच्या वॉचमेनला सुदर्शन घुले यांनी मारहाण केली.
६. त्यानंतर हत्येचा कट शिजला व पूर्णत्वास गेला.
पुढची सुनावणी १० एप्रिलला
आरोपींच्या वकिलांना जवळ जवळ सहाशे पाने कागदपत्रे देण्यात आली. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे. या सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके न्यायालयात हजर होते.












Click it and Unblock the Notifications