Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संतोष देशमुख हत्या; उज्ज्वल निकमांनी बीड कोर्टात काय युक्तिवाद केला?, वाल्मीक कराडविषयी काय म्हणाले?

Ujjwal Nikam Argument Update Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात या प्रकरणात पहिला युक्तिवाद केला.

निकम यांनी कोर्टासमोर सांगितले की, संपूर्ण प्रकरणात वाल्मीक कराड याने गाईड केले. वाल्मीक कराड या घटनेला गाईड केल्याचे सीडीआरमधून समोर आल्याचेही उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटले आहे.

आरोपींना व्हिसीद्वारे हजर करण्यात आले

आजच्या सुनावणीदरम्यान आरोपींना व्हिसीद्वारे हजर करण्यात आले. दरम्यान, सुनावणी पार पडल्यानंतर अॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत सुनावणीबाबतची अपडेट दिली.

Santosh Deshmukh murder case

प्रत्येक तारखेचा आमच्याकडे पुरावा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून एका मोठ्या कटाचा परिपाक आहे. हा कट कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे, असा देखील दावा न्यायालयात केला.

विशेषत: वाल्मीक कराडने ज्याप्रमाणे धमकी दिली, त्याप्रमाणे गँग लीडर सुदर्शन घुले तिथे प्रत्यक्ष आला. सुदर्शन घुलेने देखील धमकीचा पुनरुच्चार केला. या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरुपात आहेत, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे निवेदन

हा कट दोन किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच, परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत. यातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचाही गुन्ह्यात सहभाग कसा आहे, याबाबत आम्ही न्यायालयाला विषद केले. काही महत्त्वाच्या साक्षीदारांची ओळख गोपनीय ठेवावी, अशी न्यायालयाला विनंती केली आहे. आरोपींची संपत्ती संघटीत गुन्हेगारी कायद्याखाली जप्त करावी, अशीही विनंती आज न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयात अर्ज केलेले आहेत, असेही निकम यांनी सांगितले.

पुढील सुनावणी कधी होणार?

तपास अधिकारी आणि माझे सहकारी अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपींच्या वकिलांना लागणाऱ्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली. आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यांनुसार ही घटना 8 ऑक्टोबर 2024 पासून ते 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुखांची निर्घृण हत्या होईपर्यंत या घटनेची मालिका न्यायालयात विषद केली. प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमच्याजवळ पुरावा आहे. यातील संघटीत गुन्हेगारी कशी फोफावली गेली? आणि यातील म्होरक्या सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता, हे देखील न्यायालयात स्पष्ट केले.

आरोपींना हवी होती, ती सर्व कागदपत्रे देण्यात आलेली आहे. सुनावणीची पुढील तारीख 10 एप्रिल ठेवली आहे. त्यादिवशी आम्ही न्यायालयाने आरोपींवर कोणकोणते गुन्हे करावेत, चार्ज फ्रेम करावा, याबाबतचा विनंती अर्ज देणार आहोत, असे निकम यांनी स्पष्ट केले.

वाल्मीक कराडच्या वकिलांनी काय केली मागणी

आजच्या सुनावणीला वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे आणि वकिलांची टीम उपस्थित होती. यावेळी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपींची ओळख परेड झाली. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केस ओपन करण्याची मागणी केली. त्यांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा सीडीआर कोर्टासमोर सादर केला. त्यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी हे पुरावे आपल्याला देण्यात यावेत, अशी मागणी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+