वाल्मिक कराडविरुद्ध पुराव्याची जंत्री! उज्ज्वल निकम म्हणाले -"कटाचा सूत्रधार नेहमी पडद्यामागे असतो"
Santosh Deshmukh murder case : "कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो; तो आपल्या कठपुतळ्यांमार्फत दृष्कृत्य घडवून आणतो. आम्ही आज न्यायालयात वाल्मिक कराडविरोधात न्यायालयात पुराव्याची जंत्रीच मांडली" असे वक्तव्य सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीनंतर आज 24 जून रोजी निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी सात जुलैला
आज न्यायालयात सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी पुढील सुनावणी 7 जुलै रोजी असणार आहे असे सांगितले. आज 24 जून, मंगळवारी कोर्टाचे कामकाज तीन तास चालले. आरोपी वाल्मीक कराडच्या वकिलांकडून दोन तास युक्तिवाद तर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी एक तास युक्तीवाद केला. आज केवळ दोष मुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचे यापुर्वीच वाल्मिक कराड यांनी म्हटले होते. या प्रकरणात तो सध्या कारागृहात आहे. त्याने वकिलामार्फत आपण याप्रकरणात दोषमुक्त आहोत आणि त्याच्यावर लागलेल्या मकोका कायद्यासंदर्भात त्याने आव्हान दिले. या प्रकरणात आज सुनावणी झाली असून वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी कराड याची जोरकसपणे बाजू मांडली.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
ॲड. उज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वाल्मीक कराड याने संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सहभाग नाही, मकोका लागत नाही हा जो युक्तिवाद होता त्याला आम्ही कडाडून विरोध केला. आमच्याकडील पुरावे सादर केला आणि कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कट पुतळ्या मार्फत तो दुष्कृत करत असतो किंवा ऍक्टिव्हिटी करत असतो.. त्याप्रमाणे आज प्रतिपादन केले आणि न्यायालयाने सात जुलैपर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे.
वाल्मिक कराडचे वकिल काय म्हणाले?
सुत्रांच्या माहितीनुसार, वाल्मिक कराडच्या वकिलांनी मुंबई बॉम्बस्फोटाचा दिलेला रेफरन्स या केसला अप्रोल होणार नाही असे म्हटले आहे. त्यांचं (सरकारी वकिलांचे) पूर्वीपासून म्हणणं आहे की वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार आहे. मात्र आमचं म्हणणं आहे की कसलाही, कुठलाही पुरावा नाही. अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे. मात्र पुरावा नाही, काही गोष्टी पोलिसांच्या नाहीतर न्यायालयाच्या हातात असतात, आज फक्त डिस्चार्ज एप्लीकेशन वर युक्तिवाद झाला. मात्र संपत्ती जप्तीवर कुठलाही युक्तिवाद झाला नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications