राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेवरून संजय राऊतांची टीका काय म्हणाले ?
मुंबई : राज्यात दिखावा करणारे अनेक जण आहेत. ते काही जण बोलतात एक आणि करतात एक असा हल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर चढवला आहे. तसेच काही पक्ष हे नेहमी महाराष्ट्र विरोधी पक्ष घेण्यासाठी निर्माण झाले आहेत असेही ते म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी विधानसभेत स्वबळावर 250 जागा लढवण्याची घोषणा केली. यावरून राऊतांनी टीका केली आहे.
राज ठाकरेंवर टीका...
राज ठाकरे नुकताच परदेशातून आले आहेत. ते बराच काळ तिकडे होते. त्यामुळे राज्यात काय सुरू आहे, हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे शत्रू अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता फक्त एका महिन्यात त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे, हे आश्चर्यकारक आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.मुळात राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे.

मात्र, महाराष्ट्रात अपशकून घडवून आणण्यासाठी असे निर्णय घेतला जात आहेत का? हे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी पक्षांना बघावं लागेल. खरं तर यावर जास्त काही बोलण्यात अर्थ नाही. काही पक्ष आणि संघटना या महाराष्ट्राविरोधी निर्णय घेण्यासाठीच स्थापन झाल्या आहेत, असेही संजय राऊत म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी नव्हे इतकं मोठे यश मिळवलं आहे. हे पक्ष टिकल्याचे लक्षण आहे. कार्यकर्ते जागेवर असल्याचे लक्षण आहे. 8 लोकसभेच्या जागा जिंकणं माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही लहान गोष्ट नाही त्याचप्रमाणे आमचाही पक्ष शिवसेना ताकदीने उभा आहे आणि आम्ही 9 जागा जिंकलो. या राज्याचा त्यांना खूप अभ्यास करावा लागेल. असे संजय राऊत म्हणाले.
याशिवाय शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव होणार आहे. आता धावाधाव करून काय मिळवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा मान राखला तर 24 तासात हे सर्व अपात्र ठरतील. शिंदे गटाचे पक्ष आणि चिन्ह गोठवले जाईल असे राऊत म्हणाले.












Click it and Unblock the Notifications