सुमित कदमला वाय दर्जाची सेक्युरिटी का दिली? त्याने असं काय कर्तव्य बजावलं, संजय राऊत यांचा सवाल

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी सांगत आहे की,सुमित कदम आणि आमचा काही संबंध नाही. मात्र सुमित कदमचा भाजप आणि आरएसएसशी संबंध असल्याचे संजय राऊत यांनी आरोप केला आहे. सुमित कदम कोण आहे? त्याला वाय दर्जाची सेक्युरिटी का दिली, त्याने असं काय कर्तव्य बजावलं, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणाले अनिल देशमुख यांनी जे आरोप केले ते खरे आहेत. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी व्यक्ती पाठवला होता. तो गृहस्थ फडणवीस यांच्यातर्फे देशमुख यांना भेटत राहिला. सुमित कदमचा भाजप आणि आरएसएसशी संबंध आहेत. सुमित कदम कोण आहे? त्याला वाय दर्जाची सेक्युरिटी का दिली, त्याने असं काय कर्तव्य बजावलं, असा सवाल ही संजय राऊतांनी उपस्थित केला. आता फडणवीसांची टोळी समित कदमशी आमचा संबंध नसल्याचे सांगेल. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमधून सत्य बाहेर आलं आहे.

Sanjay Raut

अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वेशांतर करून फिरत होते. तोंड दाखवायला काय लाज वाटते काय? जे करायचं ते खुलेआम करा, असं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला. जे झुकले ते भाजपसोबत गेले. ज्यामध्ये अजित पवार,एकनाथ शिंदे आहेत आणि जे झुकले नाहीत घाबरले नाहीत ते अनिल देशमुख जेलमध्ये गेले.अशोक चव्हाण यांचं आदर्श घोटाळ्यात नाव आलं. ते भाजपमध्ये गेले की ते संपलं, त्यानंतर भावना गवळी यांच्यावर देखील आरोप झाले होते. त्या आता विधान परिषदेवर आहेत असं संजय राऊत म्हणाले.

मला सुध्दया धमकी देण्यात आली होती. मी याबाबत राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून कळवले होते. तुम्ही सरकार स्थापन करण्याचा नाद सोडा, नाहीतर तु्म्हाला जेलमध्ये टाकू, अशी धमकी मला काही लोकांनी दिली होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संघ परिवाराचे लोक कशाप्रकारे तुमच्याकडे येतात, हे मला माहिती आहे. ते आधी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतात. आपण ऐकलं नाही की ते धमकावतात, इशारे देतात. तुमचं भविष्य कसं धोक्यात आहे, हे सांगतात. तुम्हाला ईडी आणि सीबीआयच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल, असं सांगून ओढून नेतात, असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+