Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

त्यांचं सरकार येणार असेल तर ते अपक्षांना का चुचकारताहेत..? संजय राऊतांनी थेट धूतलंच

Sanjay Raut's allegation- महाविकास आघाडीचे 160 ते 165 आमदार निवडून येतील आणि आम्हीच सरकार बनवू, असा पुनरुच्चार शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी पुन्हा केला. महायुती सरकारचा एक्झिट पोलवर विश्वास आहे तर, ते आत्तापासूनच अपक्षांना का चुचकारताहेत, असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर पुन्हा निशाणा साधला.

Sanjay Raut

एक्झिट पोलवर विश्वास नाही

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, लोकसभेला एक्झिट पोलने समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा मिळतील, असे भाकीत वर्तवले होते. त्यांनी 40 जागा जिंकल्या. मोदींना 400 जागा मिळणार, असं सांगितलं होतं. त्यांना बहुमत सुद्धा मिळालं नाही. लोकसभेला आम्हाला दहा पण जागा मिळणार नाही, असा दावा करण्यात आला होता. निकालानंतर काय झालं..? आम्ही 31 जागा खेचून आणल्या. त्यामुळे एक्झिट पोलवर आमचाच काय, पण कुणाचाच विश्वास नाही. महाविकास आघाडीचे व मित्रपक्षाचे 160 ते 165 आमदार निवडून येतील, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

मविआ 160 जागा जिंकेल

महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील आम्ही सर्व जण एकत्र बसलो. महाराष्ट्राचा अंदाज घेतला. अनिल देसाई, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील यांच्यासह सर्व नेते मंडळी एकत्र होती. प्रत्येक जागाचं गणित मांडलं. तेव्हा आम्ही 160 जागांवर सहज निवडून येऊ असं स्पष्ट झालं, असा दावा त्यांनी राऊत यांनी केला. आता निकालानंतर सगळ्या आमदारांना एकत्र मुंबईत आणण्याचं आमचं नियोजन आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ते अपक्षांना का चुचकारताहेत?

एक्झिट पोल सांगतोय तसा बहुमताचा आकडा जर महायुतीकडे आहे, तर मग ते अपक्षांना लोणी का लावत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले. महायुतीचे नेते उशाला पैसे घेऊन झोपताहेत. त्यांना त्याशिवाय झोपच येत नाही. आता ते अपक्षांना 50 खोके, 100 खोके असं लालूच दाखवत आहेत. एक्झिट पोलवर त्यांचा विश्वास असता आणि त्यांचं सरकार येणार असतं, तर त्यांना अपक्षांना चुचकारलंच नसतं ना.. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही 26 नोव्हेंबरला सरकार बनवणार आहोत, असा दावा संजय राऊत यांनी शेवटी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+