Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

न्यायदेवतेची पट्टी हटवली, संजय राऊतांचा BJP-RSS वर निशाणा, नेमकं काय म्हणाले? वाचा

Sanjay Raut's accusations against BJP and RSS : न्यायदेवतेच्या डोळ्यावर यापूर्वी पट्टी होती व हातात तराजू होता. न्यायदेवता कुणाचाच भेदभाव करत नाही, असा त्याचा अर्थ होता. मात्र आता न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटविण्यात आली. संविधान हातात देणं, ही आरएसएसची परंपरा आहे.

संविधानाच्या दहा शेड्यूलवर निर्णय घेऊ न शकणारे आता न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढत आहेत, असा थेट आरोप खासदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला. गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढण्याच्या मु्द्यावरुन भाजपला खडे बोल सुनावले.

Sanjay Raut s accusations against BJP and RSS

नेमकं काय म्हणाले संजय राऊत

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भारतीय न्यायव्यवस्था भेदभाव करत नाही, याचं प्रतिक म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती. एका हातात तराजू होता. दुसऱ्या हातात तलवार होती. आता यात बदल करण्यात आला. संविधान हातात घेणं भाजप- आरएसएसची परंपरा आहे.

न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन्याय करणाऱ्यांचं मुंडकं उडवून टाकण्यासाठी असते. समोर किती मोठी व्यक्ती आहे, ती श्रीमंत आहे, शक्तिमान आहे, ते पाहून मी न्याय करणार नाही, यासाठी डोळ्यावर पट्टी असते. मात्र गेल्या चार वर्षात काही न्याय झालाच नाही. न्यायालयाच्या काही लोकांनी भारतीय जनता पक्षाला मदत करायचं ठरवलं आहे. उघड्या डोळ्यांनी आता भ्रष्टाचार पाहा. त्यासाठी त्यांनी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढली, डोळ्यावरील पट्टी काढली, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपला फटकारलं.

न्यायदेवतेचा अनुभव आम्हालाही आलाय

राऊत पुढे म्हणाले की, संविधानाचं रक्षण करणं हे न्यायालयाचं काम आहे. पण सर्वोच्च न्यायालयात हे होतय का..? तुम्ही संविधान दिलं, पण तुम्हीच संविधान संपवताय. आमच्या पक्षाने न्याय देवीचा अनुभव घेतला आहे. संविधानाची हत्या रोज होत आहे. संविधानाचा पुस्तक हातात देऊन न्यायालय आरएसएसचा अजेंडा पसरवत आहे. ईव्हीएम संदर्भात घोटाळा होतो तेव्हा तुम्ही क्लिन चीट दिली.

कायद्याचा कारभार करून विरोधी पक्षाला खतम केला जात आहे आणि हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात. हा प्रोपोगंडा आहे. याला जातीय आणि धार्मिक रंग दिला जातो या देशात मुस्लिमांनी ख्रिश्चनांनी जैन समाजाने मतदान करायचं नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+