MVA चे 99 टक्के जागावाटप पूर्ण, आज याद्या जाहीर होणार, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

Sanjay Raut on seat allotment MVA : महाविकास आघाडीचे काल 99 टक्के जागावाटप पूर्ण झाले आहे, आज याद्या जाहीर होणार आहे, अशी मोठी माहिती शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत आज मुंबईत माध्यमांशी वार्तालाप करत होते. यावेळी त्यांनी आज संध्याकाळी याद्या जाहीर होणार आहेत असे म्हणत एबी फाॅर्मही उमेदवारांना दिले जात असल्याचे स्पष्ट केले.

Sanjay Raut on seat allotment MVA complete allotment

जागावाटपावर जवळजवळ 99 टक्के काम पुर्ण

संजय राऊत म्हणाले, काल रात्री आम्ही जागावाटपावर जवळजवळ 99 टक्के काम पुर्ण केले आहे. इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या असतील त्यांना विरोधीपक्षात बसायचे आहे, आम्हाला सरकार बनवायचे आहे. त्यामुळे आम्ही विचारपुर्वकच सर्व निर्णय घेत आहोत. प्रत्येक मतदारसंघात तोलून मापून मोजून जागावाटप करत आहोत. आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेऊन तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घोषणा करतील त्यामुळे चिंता करु नका. मला असे वाटत नाही की आता बैठकीची गरज नाही.

शंभर जागा निवडून आणायच्याय

संजय राऊत म्हणाले, शिवसेना या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे त्यामुळे शिवसेनेने जागावाटपातच नाही तर विजयातही शतक ठोकावे असे लोकांना वाटते. महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा आहे की, शिवसेनेने शतकी जागा मिळवून जिंकाव्या.

निकाल आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार हे सांगेल

संजय राऊत म्हणाले, आज संध्याकाळी याद्या जाहीर होणार आहेत. जागावाटप पुर्ण झाले आहे. निवडणुका होतील, निकाल लागल्यानंतर साडेदहा वाजता मी कोण नैतृ्त्व करणार हे सांगेल. याद्या अजून जाहीर झाल्या नसल्या तरीही एबी फाॅर्म गेले आहेत. तिन्ही पक्षांनी एबी फाॅर्मवाटप करणे सुरु केले आहे. याद्या ही एक प्रक्रीया आहेत. आमच्याकडे आम्ही एबी फाॅर्म देत आहोत. कुणी अर्ज भरले हे तुम्हाला कळणार आहे.

बंडखोरच गेले आता बंडखोरी होणार नाहीच

संजय राऊत म्हणाले, बंडखोरी होणार ही शक्यता अजिबात नाही. ज्यांना वर्षानुवर्षे उमेदवाऱ्या दिल्या रंकाचे राव केले ते रावसाहेब सगळे सोडून गेले आहे. त्यामुळे आम्हाला बंडखोरीची चिंता नाही. आमच्याबाजूने ट्रेंड आहे म्हणूनच आमच्या पक्षात इनकमिंग आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+