महाविकास आघाडी अन् जागावाटपावर काय होणार? शंका, प्रश्नांवर संजय राऊतांनी केलं मोठ वक्तव्य, वाचा
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणार आहे पण महाराष्ट्रातील सत्ताधारी नेते अजूनही जागावाटपासाठी दिल्लीत उठबशा काढत आहेत. जागावाटपासाठी आम्ही कधी दिल्लीत गेलो नाही. उद्धव ठाकरे जागा वाटपासाठी मला जागा द्या असे म्हणत कधीच दिल्ली गाठली नाही, पण हे लोक आता त्यांच्या दारी जात असल्याची टिका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत आज मुंबईत माध्यमांशी वार्तालाप केला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीबाबत सुरु असलेल्या चर्चां आणि शंका, प्रश्नांवर स्पष्टोक्ती दिली.

संजय राऊत म्हणाले, वरुण सरदेसाई यांच्याविरोधात झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे. हे होणारच आहे. झिशान सिद्दीकी असो की सना मलिक यांना उमेदवारी देणे हा त्या-त्या पक्षांचा निर्णय़ आहे.
जागावाटपात इडिटींग होऊ शकते
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात अजून काही बदल होऊ शकतो. आमच्या वृत्तपत्राच्या भाषेत त्याला इडिटींग करणे असे म्हणतात. तसे पाहिले तर जागावाटपासंदर्भात आमची चर्चा आता पुर्ण झाली आहे. काही जागांसंदर्भात अंशतः अंतर्गत बदल होऊ शकतो. आमच्यात म्हणजे महाविकास आघाडीत काही जागांवर पुन्हा चर्चा होऊ शकते. रामटेक, सांगोला येथील जागेवर काहीच पेच नाही त्या आमच्या जागा आहेत आम्ही निर्णय घेणार आहोत.
सोमवारपर्यंत मविआचे सर्व चित्र स्पष्ट होणार
संजय राऊत म्हणाले, आम्ही काही उमेदवारांची निवड केली आणि त्यांच्या उमेदवारीसंदर्भात घोषणा केली आहे. आज आम्ही छोटे-छोटे जे पक्ष आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सोमवारपर्यंत आम्ही पुर्ण यादी जाहीर करणार आहोत. दोन दिवस सध्या आहेत, त्यात आम्हाला नामांकनपत्र देखील दाखल करावे लागणार आहे.
संजय राऊत म्हणाले, स्वतःला शिवसेना म्हणून नाव लावून घेताना दिल्लीत जाऊन जागावाटप केले जात आहे. हे आम्ही कधीही केले नाही. उद्धव ठाकरे कधी जागावाटपासंदर्भात गेले नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही असे कृत्य होऊ नये अशी अपेक्षाही संजय राऊत यांनी व्यक्त केली.
विचार करुण अजय चौधरींना उमेदवारी
संजय राऊत म्हणाले, आमचे जागा वाटप ठरलेले आहे पण त्यांचे कधी होणार निर्णय कधी होणार हे आपण त्यांना विचारावे. सुधीर साळवी शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमचे सहकारी आहेत. त्या ठिकाणी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. मला वाटत नाही की, सुधीर साळवी हे नाराज आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त करणे हा गुन्हा नाही. अजय चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक आहेत याचा विचार करुन त्यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications