Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंधराशे रुपयांत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचे घर चालणार का? संजय राऊत यांचा महायुतीला सवाल

मुंबई - महायुती सरकार राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना लागू करत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्यामुळे या योजना सुरू केल्या जात आहेत. लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये दरमहा दिले तर दीड हजार रुपयांमध्ये बहिणीचे घर चालणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

दीड हजार रुपयांनी काय होणार आहे? मुख्यमंत्र्यांचं घर चालणार आहे का दीड हजार रुपयात? लाडक्या भावांप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनाही दरमहा 10 हजार रुपये द्या, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारकडे केला.

sanjay raut onladki bahin yojana

'त्या' सुशिक्षितानांही 10 हजार द्या

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, तर पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मात्र आमची भूमिका आहे, की खरी गरज लाडक्या बहिणींना आहे, ती घर चालवते. घरात भाऊ बेरोजगार, नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत, एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25 हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली, ही या महाराष्ट्राची स्थिती आहे.

हे सगळे लाडके भाऊ आहेत, यांनाही 10 हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यातही 10 हजार रुपये टाका, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

लाडक्या बहिणीलाही भावाप्रमाणे दहा हजार द्या

1500 रुपयांनी काय होणार आहे? मुख्यमंत्र्यांचं घर चालणार आहे का दीड हजार रुपयात? मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण, लाडकी सून यांचं घर 1500 रुपयात चालू शकेल का? लाडक्या बहिणीवर अन्याय कशाला? लाडक्या बहिणीलाही 10 हजार द्या आणि लाडक्या भावालाही. स्त्री पुरुष समानता महाराष्ट्रात दाखवून द्या, एवढीच आमची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले.

पराभवामुळे 'या' योजना आणल्या

महाराष्ट्रावर 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, लोकसभा निवडणूक हरल्यानंतर सरकारने नवनवीन योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहीण ही मध्य प्रदेशच्या योजनेची कॉपी आहे. आता लाडका भाऊही आणलंय. पण 10 हजारात बहिणींचं घर चालेल, शेतकरी आत्महत्या थांबतील का? राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही फक्त 288 जागांची चाचपणी करतोय. मविआतील तिन्ही पक्ष तसाच अभ्यास करत आहेत. मग एकत्र बसून कोणी कुठे कशा जागा लढायच्या हे ठरवू, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+