Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sanjay Raut defamation case punishment :रश्मी ठाकरे राऊतांना डच्चू देतील! 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut defamation case punishment : संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने शिक्षा ठोठावली. त्यानंतर आता राजकारण गरमागरम झालं असून भाजपकडून संजय राऊत यांना टार्गेट केलं जात आहे. "संजय राऊत यांनी सामनाचे संपादकपद सोडावं, त्यानी ते सोडलं नाही तर रश्मी ठाकरे या संजय राऊत यांना डच्चू देतील अशी अपेक्षा मला आहे." असं वक्तव्य भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यांनी केलं आहे.

शौचालयाच्या एका प्रकल्पात बांधकामावेळी शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर शिवसेना युबीटी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

Sanjay Raut defamation case punishment

या प्रकरणी आज निर्णय आला असून संजय राऊत यांना 15 दिवस तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आता भाजपकडून तसेच संजय राऊत यांच्या विरोधकांकडून तिखट प्रतिक्रीया येत आहेत.

मला समाधान, खूप आनंद झाला - मेधा सोमय्या

मेधा सोमय्या म्हणाल्या, मला असं वाटतं की, माझा न्यायव्यवस्थेचा विश्वास वाढला. दुसरं असं की,माझ्या कुटुंब, मुलांवर जो कुणी आच आणायचा प्रयत्न करेल त्यासाठी मी लढेल तशी मी लढले आहे. मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला. मला अतिशय आनंद आणि समाधान वाटत आहे. या शिक्षेमुळे माझा विश्वास दृढ झाला आहे.

संजय राऊत यांना माझे आव्हान - किरीट सोमय्या

किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांनी एक शिक्षिका, प्राध्यपिकेला बदनाम करण्यासंबंधी माध्यमांत वक्तव्य करत बसले. त्यासाठी संजय राऊत यांना आज शिक्षा झाली असून न्यायालयानं दंड ठोठावला आहे. संजय राऊतमध्ये हिमंत असेल तर त्यांनी उद्या सर्वोच्च न्यायालयात जाऊन सरन्यायाधीशांकडे दाद मागावी. या निकालाविरोधात संजय राऊत जे आरोप करत आहेत त्यांनी आणि उद्धव ठाकरेंत हिंमत असेल तर सुप्रिम कोर्टात जावं. असंही ते म्हणाले.

संजय राऊतांनी राजीनामा द्यावा - शेलार

संजय राऊत यांना स्वतःचा राजीनामा द्यायला हवा. उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा घेतील का..हा सवाल आहे. संजय राऊत यांना पंधरा दिवसांची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. महिला आणि महिला सुरक्षेसंदर्भात आणि महिलांची बदनामी या विषयात उद्धव ठाकरे यांची शिवसेना संवेदनशील असेल तर संजय राऊत यांचा राजीनामा घेईल संजय राऊतांनी राजीनामा द्यायला हवा.

रश्मी ठाकरे राऊतांना डच्चू देतील ही अपेक्षा

जर संजय राऊत यांनी स्वतःहून संपादकपदाचा राजीनामा दिला नाही तर रश्मी ठाकरे या सामना वृत्तपत्राच्या प्रमुख आहेत त्या संजय राऊत यांना डिच्चू देतील अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रीया मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी दिली आहे.

सत्य, संदर्भ लक्षात घ्यायला हवे - उदय सामंत

दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करताना संदर्भ आणि सत्य लक्षात घ्यायला हवे असा सल्लावजा टीका शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

आमच्याकडे पुरावे - संजय राऊत

संजय राऊत यांनी खुद्द याविषयावर मत व्यक्त केलं. "मी जे बोललो त्यात बदनामी नव्हतीच. आमी सेशन कोर्टात जाणार आहोत. आमच्याकडे पुरावे आहेत. आमच्यावर न्यायव्यवस्थेत कसा अन्याय होत आहे हे आम्ही जनतेच्या कोर्टात सांगणार आहोत."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+