Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उद्या हे लालबागचा राजाही गुजरातला नेतील, संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार आहेच. अमित शाह भाजपच्या नेत्यांसोबत सोमवारी ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. ते या दौ-यात भाजप नेत्यांशी जागा वाटपाबद्दलही चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

मणिपूरमध्ये जा, जम्मू काश्मीरमध्ये जा, मुंबईत तुमचं काय आहे? मणिपूरमध्ये हल्ले होतात आणि देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन मजा करतात. असा संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहांवर हल्ला केला आहे.

अमित शहा कमजोर गृहमंत्री

संजय राऊत मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले की महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु आहेत. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे. महाराष्ट्राला कमजोर करायचे आहे. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे. ते देशाचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री असल्याने त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. अमित शाह यांना आमचा विरोध यासाठीच आहे की त्यांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण करुन महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने मुंबई महाराष्ट्रातून व्यापार, उद्योग, रोजगार अनेक महत्त्वाच्या आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत, पण कमजोर गृहमंत्री आहेत, या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.

Sanjay Raut On Amit Shaha

महाराष्ट्र दुर्बल करायचा हे यांचं स्वप्न

संजय राऊत म्हणाले की, राजकारण, पक्ष फोडी, लुटमार याला पाठिंबा देणं, मुंबई लुटणं, लुटणाऱ्यांना पाठिंबा देण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखं महाराष्ट्रातलं स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अतिकमजोर करणं अशाप्रकारची काम शहांनी केले. हे गृहमंत्र्यांचे काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुर्बल करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात, मुंबईत येत असतात.

लालबागचा राजाही गुजरातला नेण्याचा प्रस्ताव देतील

लालबागच्या राजाच्या दर्शनाला शहा येत आहेत, पण मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवले त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना? हेही होऊ शकतं. ls काहीही करू शकतात. लालबागचा राजा प्रसिद्ध आहे, देशभरातून लोक दर्शनासाठी येत असतात म्हणून अमित शाह उद्या लालबागचा राजाही गुजरातला नेण्याचा प्रस्ताव देतील. हे व्यापारी लोक आहेत. ते स्वत:ला महाराष्ट्राचा शत्रू मानतात, हे मी खूप विचार करुन बोलतोय असं संजय राऊत म्हणाले.


देवेंद्र फडणवीसांवरही केली टीका

संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे त्यांना शंभर जन्म कळणार नाही, 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीस यांना कळलं नव्हतं. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच ना. आता 2024 साली तुमच्यात हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर हे समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचा बंद होईल. अशी टीका संजय राऊत यांनी केली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+