Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : संजय राऊत अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी, 15 दिवसांची कैद 25 हजारांच्या दंडाची शिक्षा

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माझगाव कोर्टाने हा निकाल दिला आहे.

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. कोर्टाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Sanjay Raut

काय आहे शौचालय घोटाळा?

मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरु केली होती. राऊत यांनी आपण लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यामध्ये 100 कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा आरोप केला होता. "युवा प्रतिष्ठान नावाची जी काही संस्था चालवत होते हे आणि यांचं कुटुंब त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

सौमय्यांनी फेटाळले होते सर्व आरोप

किरीट सोमय्यांनी विविध विभागांना पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट करत राऊतांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. आपल्या पत्रात किरीट सोमय्या यांनी म्हटले होते की, भाजप, युवक प्रतिष्ठान, प्रा. मेधा सोमय्या, डॉ. किरीट सोमय्या यांनी कोणताही अशा प्रकारचा शौचालय घोटाळा केला नाही. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला होता. 100 कोटींचा आकडा आला कुठून? असा सवाल सोमय्यांनी त्यावेळी केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+