चौकशी करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल... आरोपानंतर अजित पवार स्पष्ट बोलले...

मुंबई : पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एक गाडीत जवळपास 5 कोटी रुपये सापडल्याने खळबळ उडाली आहे. याच मुद्यावर आज दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

राऊत यांनी थेट शहाजी बापू पाटील यांच्यावर आरोपही केले होते. याच मुद्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासही सुरूवात केली आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित दादा यांच्याकडून पैशाचं वाटप सुरू केलं आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut and Ajit Pawar

अजित पवारांनी थेट दिलं उत्तर

या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रीया विचारली. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, 'चौकशी करा ना... काही जण बिनबुडाचे आरोप करत आहेत. ज्याचे पैसे सापडले आहेत, त्याच्यासंदर्भात चौकशी करावी. दूध का दूध आणि पानी का पानी...पुढे येईल, सगळं स्पष्ट होईल' अशा शब्दांत अजित पवारांना एका वाक्यात या मुद्याचा निकाल लावून टाकला.

संजय राऊत यांनी केले होते आरोप

खेड-शिवापूर शिवारात पोलिसांना एका गाडीत सुमारे पाच कोटी रुपये सापडले. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांचा एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन शेअर केला. या व्हिडीओत पुण्यात खेड-शिवापूर परिसरातून जप्त करण्यात आलेल्या रक्कमेबद्दलची माहिती दिसत आहे. त्यावर संजय राऊतांनी चांगलाच निशाणा साधला. ज्या गाडीत ही रक्कम सापडली ती गाडी मिंधे टोळीतील एका आमदाराची असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे तो आमदार कोण याचाही उल्लेख त्यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांनी केला होता. हा मुद्दा सध्या चांगलाच गाजत असून त्यावरूनच अजित पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+