Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

झिशान सिध्दीकसह 'या' दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश, दुसरी यादी जाहीर

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आज मोठे पक्ष प्रवेश होत आहेत. आज सकाळी भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची उपस्थिती होती. दोनवेळा खासदार राहिलेले संजय काका पाटील यांना तासगाव कवठेमहांकाळ येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून स्वर्गीय आर. आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सांगलीमधून भाजपाचे निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली असून ते जयंत पाटलांविरोधात मैदानात असणार आहेत.

ncp

माजी आमदार, दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी यांनी आज सकाळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

महायुतीमध्ये वांद्रे पूर्वची जागेचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटली आहे. झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच वांद्रे पूर्वतून उमेदवारी देण्यात आली आहे. ते आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत. काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. झिशान सिद्दीकी हे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. त्यांनी 2019 साली काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक जिंकलेली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

  • वांद्रे पूर्व- झिशान सिद्दिकी
  • तासगाव - संजयकाका पाटील
  • इस्लामपूर- निशिकांत पाटील
  • अणुशक्तीनगर- सना मलिक
  • लोहा-कंधार- प्रतापराव चिखलीकर
  • वडगाव शेरी - सुनील टिंगरे
  • शिरुर - ज्ञानेश्वर कटके

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+